मुंबई

प्रसाद लाड आणि राज ठाकरेंची भेट; मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपची 'मनसे' हातमिळवणी ?

सुमित बागुल

मुंबई : येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काही ठरतंय का असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जवळीक वाढताना पाहायला मिळालीये.

समान विचारांच्या शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर भाजप आणि मनसे एकमेकांसोबत राहून राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली हिंदुत्त्ववादी पक्षाची पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न होणार असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. 

आज या चर्चांना पुन्हा उधाण आलं ते म्हणजे आज भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नानिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर झालेली भेट. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांना माहिती देखील दिली.

माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड म्हणालेत की, "माझी आणि राज ठाकरेंची झालेली भेट ही वैयक्तिक भेट होती. मी राज ठाकरे यांना हाताला लागण्याने  त्यांना पाहायला तब्बेतीची विचारपूस करण्यास आलो होतो.

दरम्यान, येत्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार का हे देखील प्रसाद लाड यांना विचारण्यात आलं. ज्यावर प्रसाद लाड यांनी अतिशय सूचक व्यक्तव्य केलं आहे. मुंबई महानगर पालिकेत आम्ही भाजपचा झेंडा फडकावणारच आणि त्यासाठी जे जे लोकं आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेणार असं सूचक  प्रसाद लाड यांनी केलं आहे. योग्य वेळी तुम्हाला उत्तर मिळेल असंही प्रसाद लाड म्हणालेत. 

mumbai political news bjp leader met mns chief raj thackeray at krushnakunja

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT