Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता लवकरच सुधारणार; हे आहे महत्वाचे कारण

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pollution: मुंबईत स्वच्छता मोहिम सुरू आहे. या अभियानाला व्यापक स्वरूप येत आहे. आता केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत पालिकेला ६२० कोटी अनुदान मिळाले आहे. त्यामुळे या अभियानाला आणि मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याला वेग येणार आहे. केंद्र सरकारच्या निधीतून साफसफाईसाठी लागणा-या मशीन आणि यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मुंबईत बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणही वाढत आहे. पालिकेने प्रदुषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे लागू केली आहे. ज्या बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषणाचे नियम पाळले जात नाहीत अशा बांधकामांना नोटीसा पाठविणे आणि बांधकामे थांबविणे, दंड आकारणे अशी कारवाई पालिकेने सुरू केली आहे.

बांधकामाच्या ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे सीसीटीव्ही बसवणे, धुळीचे कण पसरू नये यासाठी पडदे लावणे, पाण्याची फवारणी करणे, स्प्रिंकलर बसवणे अशा २७ प्रकारची नियमावली पालिकेने जारी केली आहे. पालिकेच्या महास्वच्छता अभियानांतर्गत ही कारवाई सुरू आहे. स्वच्छता अभियानाला वेग यावा आणि प्रदुषण रोखण्यास मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून केंद्राच्या वित्त आयोगाने ६२० कोटी रुपयाचे पालिकेला अनुदान दिल्याची माहिती पालिकेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT