Mumbai Pollution Esakal
मुंबई

Mumbai Pollution: प्रदूषणमुक्त दिवाळीची ऐशी की तैशी : मुंबईकरांनी फोडले तब्बल ५०० कोटींचे फटाके!

मुंबई प्रदूषण: फटाक्यांच्या चाचणीकडे दुर्लक्षामुळे धूमधडाका, विक्रीत ५०० कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Pollution: सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त करण्याचे निर्देश आणि फटाक्यांच्या चाचणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे यंदा जोरदार धूमधडाका झाला. फटाक्यांची जोरात विक्री झाली. मुंबईत दिवाळीसाठी आतापार्यंत ५०० कोटींच्या फटाक्यांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.


दिवाळी म्हणजे फटाके असे समीकरणच झाले आहे. दरवर्षी फटाक्यांच्या खरेदीत वाढ होत असल्याचे दिसते. पर्यावरणपूरक आणि फटाकेमुक्त दिवाळीचा नारा देण्यात येत असला तरी यंदा त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही.

यंदा तर फटाक्यांची आतषबाजी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे दिसले. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत सुमारे ४०० कोटींच्या फटाक्यांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांत त्यातील १५० कोटी रुपयांचे फटाके वाजले. आतापर्यंत एकूण ५०० कोटी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी झाली आहे. त्यामध्ये बॉम्ब व सुतळी बॉम्बसह आकाशात उडणाऱ्या रॉकेट फटाक्यांचा अधिक आनंद घेण्यात आला आहे.

फटाके विक्रेत्यांनी दिलेल्या महितीनुसार, गेल्या दोन-तीन वर्षांपासून चक्री, अनार आणि स्पार्कलर अशा एरियल प्रकारच्या फटाक्यांची विक्री तुलनेने कमी झाली आहे. त्याऐवजी मोठ्या आवाजातील फटाक्यांना मागणी वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आवाज करणाऱ्या फटाक्यांना यंदा मागणी वाढली आहे. शिवाजी पार्क, मरिन ड्राईव्ह, बॅण्ड स्टॅण्ड इत्यादी ठिकाणी मुंबईकर फटाके फोडण्यासाठी गर्दी करत आहेत

चिंताजनक एक्यूआयची नोंद


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विषारी रसायने असलेल्या फटाक्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० अशी वेळ निर्धारित केली गेली आहे.

तरीही बंदी असलेल्या बेरियम रसायनाचा वापर करण्यात आलेल्या फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इतकेच नाही; तर अनेक विभागांत सकाळी ४ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १ वाजेपर्यंत फटाके फोडले जात आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत लगेचच हवा प्रदूषणात वाढ झाल्यामुळे चिंताजनक एक्यूआयची नोंदही झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT