Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: मुंबईत मास्क लावून फिरण्याची गरज नाही; आयुक्तांनी दिली माहीती

Mumbai Pollution: मुंबईतील नागरिकांना अद्याप मास्क लावण्याची गरज नसल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pollution: मुंबई महापालिका परिसरासह उपनगरीय भागातील हवेचा ‘एक्यूआय’ अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक असून दर्जा हळूहळू सुधारत असल्याचे चित्र आहे. बुधवार (ता. ८) पासून मुंबईतील हवा चांगल्या दर्जाची असल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही त्याला दुजोरा दिला असून मुंबईतील ‘एक्यूआय’ आता आधीपेक्षा कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेतर्फे आणखी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, मुंबईतील नागरिकांना अद्याप मास्क लावण्याची गरज नसल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

आयुक्त चहल यांनी सर्व पालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांसोबत चर्चा केली. अस्थमा किंवा इतर आजारांच्या रुग्णांच्या वाढीसंदर्भातही माहिती घेण्यात आली. अद्याप पालिका रुग्णालयांत अशा आजारांच्या रुग्णांची संख्या फार वाढलेली नाही. परिणामी काळजीचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पालिका प्रशासनाने एकूण २७ मुद्द्यांची मार्गदर्शक सूचना तयार केली आहे. त्यात मुंबईतील रस्ते स्वच्छ करण्यापासून दर आठवड्याला एक्यूआयची पातळी तपासली जाणार आहे. त्यासह पोलिस प्रशासनही त्यात जातीने लक्ष देणार आहे. रात्री सात ते दहानंतर कोणीही नियम न पाळल्यास कारवाई होणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग

- हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेतर्फे मुंबईच्या प्रवेश मार्गावर स्प्रिंकल सिस्टीम बसवली जाणार आहे.

- एक मोबाईल ॲप तयार केले जाणार असून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ तोडगा काढला जाईल. त्या संदर्भातील नोटीसही जाहीर करण्यात आली आहे.

- बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण होताना आढळले तर ते थांबवण्याचेही आदेश देण्यात येतील.

- दिल्लीच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT