eknath khadse esakal
मुंबई

Shivsena : वडिलांनी कमावलं अन् पोरांनी गमावलं - एकनाथ खडसे

वाडवडीलांनी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवल

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडीलांनी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवले. परंतु तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवल हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक गोष्ट आहे अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली.

विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि काँग्रेस आमदार शिरीष चौधरी हे डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे, त्याबद्दल खडसे यांनी आपले मत मांडले, ते म्हणाले,सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली आणि धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रात अनेक सत्ता केंद्रावर शिवसेनेने सत्ता काबीज केली. महाराष्ट्र सरकार मध्ये मुख्यमंत्री म्हणून ही त्यांचे मुख्यमंत्री झाले आणि वर्षानुवर्षाची जी पुण्याई होती ती दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडीलानी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवल.त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आला तर समजेल परंतु निवडणूक चिन्ह तात्पुरता का होईना गोठवल हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक गोष्ट आहे असे ते म्हणाले.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे, यावर खडसे म्हणाले, या केसच भवितव्य आता अंधारात आहे. रश्मी शुक्ला ज्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी रश्मी शुक्लाना क्लिन चिट मिळेल अस वाटलं होतं. फोन टॅपिंगसाठी मदत करत असताना त्या ठिकाणी त्या प्रमुख होत्या. माझा ही फोन 68 दिवस टॅप करण्यात आला. कोणत्या कारणासाठी माझा फोन टॅप करण्यात आला याची मला अजूनही कल्पना देण्यात आलेली नाही. एफआयआर दाखल झालेला आहे. चौकशी सुरू आहे असं सांगण्यात येत. रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. आता त्यांना क्लिन चिट दिली आहे , त्यामुळे या केसच भवितव्य आता अंधारात आहे.

काँगेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी हे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे त्यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, केंद्राच्या यंत्रणांनी कायदा नियम आणि घटनेचा चोळामोळा करायचे ठरवलेच आहे, तर काय बोलायचं. एवढेच मला एक सामान्य माणूस म्हणून वाटते, राजकीय व्यक्ती म्हणून नाही. या देशाची घटना, स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायची आहे हे काम जर चाललेल असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा काय करायचं आहे ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT