mumbaipune-expressway
mumbaipune-expressway 
मुंबई

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत महामार्गावरील वाहतूक शेडुंग फाटा येथून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात येणार आहे.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे टोलनाक्यापासून काही अंतरावर ओव्हरहेड गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे. शुक्रवारी खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबईहून पुण्याकडे येणारा मार्ग दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्गाची आखणी करण्यात आली असून, वाहनधारकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे

काय आहे पर्यायी मार्ग ?
वाहनधारकांना शेडुंग फाटा, अजिवली चौक, दांड फाटा,चौक (कर्जत) फाटा, खालापूर फाटा (सावरोली फाटा) येथून खासापूर मार्गे परत खालापूर टोल नाका येथून पुण्याकडे जाता येईल. तसेच अवजड मालवाहू वाहनांना एक्स्प्रेस वेवरील चिखले पूल येथे थांबवण्यात येईल, असे  अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) विजय पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT