Overturned gas tanker on the Mumbai-Pune Expressway causing heavy traffic congestion and halting Mumbai-bound vehicles as emergency teams manage the situation.

 

esakal

मुंबई

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

Gas Tanker Overturns : उलटलेल्या टँकरमधून सुरू असलेली गॅस गळती रोखण्याचे अन् टँकर बाजूला करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू

Mayur Ratnaparkhe

Gas tanker overturns on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मागील चार तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कारण, या मार्गावर एक मोठा गॅस टँकर उलटला आहे. एवढच नाहीतर त्या टँकरमधून गॅसही लीक होत असल्याने,परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आल्याची माहिती आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सांयकाळी साधारण साडेसहा वाजेच्या सुमारास हा गॅस टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. आता हा टँकर बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रय़त्न सुरू आहे. परिणामी वाहनचालकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

उलटलेल्य टँकरमधून गॅस बाहेर येत असल्याने, तो थांबवण्यासाठी केमिकल तज्ज्ञांनाही पाचारण केले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. ही गळती पूर्णपणे थांबण्यात आल्यानंतरच या मार्गावरून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे.

तर सध्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून बोरघाटामधून खोपोली मार्गे हलकी प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तर टँकर उलटल्याच्या ठिकाणी अधिकारी, पोलीस, फायर ब्रिगेड टीम आदी सर्वजण दाखलक झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

Judicial Budget : न्यायव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद : ॲड. असीम सरोदे

SCROLL FOR NEXT