Mumbai - Pune Expressway sakal
मुंबई

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

या कालावधीत रस्त्यावरील दरड हटवण्यात येणार आहेत

सकाळ डिजिटल टीम

Mumbai-Pune Expressway Traffic Updates: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक २ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटवण्यात येणार आहेत.

रविवारी (२३ जुलै) रात्रीच्या सुमारास महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटवण्यात आली होती. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या. अद्याप एक लेन अजुनही बंद आहे.

याच दरडी हटविण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एक्सप्रेस वेवरील वाहतूक या दोन तासांसाठी वळवण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे येताना चिवळे पॉइंट लागतो, तिथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळवण्यात येणार आहे.

याच मार्गावरुन चार चाकी, हलकी मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील. १२ ते २ यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवण्यात येईल. दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT