chain smoker sakal
मुंबई

Railway Police Force : आरपीएफकडून ' मिशन गर्दुल्ले'!

नुकतीच कल्याण लोकलमध्ये दिव्यांग डब्यात एका दिव्यांग प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ (थिनर) टाकून जाळण्याचा प्रयत्न एका गर्दुल्याने केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नुकतीच कल्याण लोकलमध्ये दिव्यांग डब्यात एका दिव्यांग प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ (थिनर) टाकून जाळण्याचा प्रयत्न एका गर्दुल्याने केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

मुंबई - नुकतीच कल्याण लोकलमध्ये दिव्यांग डब्यात एका दिव्यांग प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ (थिनर) टाकून जाळण्याचा प्रयत्न एका गर्दुल्याने केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता रेल्वे सुरक्षा दलाने 'मिशन गर्दुल्ले' हाती घेतले असून प्रवाशांना लोकल प्रवासात. गर्दुल्ले दिसताच रेल्वे पोलिसांच्या १३९ हेल्पलाईन क्रमांकवर संपर्क करण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने केले आहे.

मुंबईतील रेलवे स्थानकांवर व् रेलवे डब्यांमध्ये भिकाऱ्यांचे आणि गर्दुल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहेत. आता तर चक्क रेल्वे डब्यातचं गर्दुल्यांकडून थिनरचा नशा करतांना दिसून येतं आहेत. रेल्वे गांडीत दरवाज्या समोरचं गर्दुल्ले आपले बस्तान बसल्यामुळे डब्यात चढताना प्रवाशांना मनस्तापाला समोर जावे लागत आहे. सोबतच रेलवे स्थानकांवर विश्रांतीसाठी बसवण्यात आलेल्या बाकड्यांवर गर्दुल्ले बसतांना दिसून येत. त्यामुळे प्रवाशांना त्रासला समोर जावे लागते. मात्र,याकडे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून डोळे झाकपणा केला जातोय.

शनिवारी रात्री कल्याण लोकलमध्ये दिव्यांग डब्यात एका दिव्यांग प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ (थिनर) टाकून जाळण्याचा प्रयत्न एका गर्दुल्याने केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता झोपी गेल्याला रेल्वे सुरक्षा दला जाग आली असून 'मिशन गर्दुल्ले' हाती घेतले. या रेल्वे स्थानकात असलेल्या गर्दुल्याना आळा घालण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने प्रवाशांना केले आहे.

काय होती घटना -

शनिवारी दिवा येथे राहणारे प्रमोद वाडेकर कर्णबधिर प्रवासी शनिवार २५ मार्च रोजी रात्री कांजूरमार्ग येथून दिवा येथे जात असताना रेल्वेगाडीतील अपंगाच्या डब्यात एका व्यक्तीने अंमली पदार्थाचे ज्वलनशील पदार्थ त्यांच्या शर्टवर टाकली. यामुळे लागलेल्या आगीत प्रमोद यांचा संपूर्ण डावा हात भाजला. तसेच उजव्या हाताच्या पंजालाही दुखापत झाली. ठाणे आरपीएफ आणि जीआरपीने एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलेअसून तो गर्दुल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रवाशांकडून सहकार्य करावेत -

गर्दुल्यांकडून होणाऱ्या घटना रोखण्यासाठी आरपीएफ, जीआरपी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान रेल्वे स्थानकात, रेल्वे डब्यांमध्ये ठिकठिकाणी तैनात आहेत. प्रतिदिन ५५ ते ६० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर प्रवास करतात. एका वेळेस प्रत्येक ठिकाणी पोहचणे अशक्य असल्याने प्रवाशांनी देखील सतर्क राहणे आवश्यक आहेत. रेल्वे प्रवासात एखादा प्रसंग निदर्शनास आला अथवा घडला तर रेल्वेच्या १३९ हेल्पलाईनवर तात्काळ पाठवल्यास आरपीएफ, जीआरपी कडून त्वरित कारवाई करण्यात येईल. यासाठी प्रवाशांनी स्वतः रेल्वे पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी सांगितली आहे.

प्रतिक्रिया -

रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यातून गर्दुल्याना हद्दपार करण्यासाठी आरपीएफने योजना आखली आहे. परंतु, प्रवाशांनी देखील सतर्क राहत असे प्रसंग लक्षात येताच तात्काळ १३९ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावेत. जेणेकरून आम्हाला गर्दुल्यावर कारवाई करण्यास मदत होईल.

- ऋषी शुक्ला, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आय़ुक्त, आरपीएफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT