Railway Mega block sakal media
मुंबई

मुंबई : रविवारी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर (Mumbai Railway) रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (railway repairing work) रविवारी (ता.24) रोजी मेगाब्लॉक (railway mega block) घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल सेवा वेळापत्रकापेक्षा (train timetable) 10 मिनिटे उशीराने सुटतील.

कुठे : ठाणे- कल्याण अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान मुलुंड येथून सुटणा-या डाऊन धीमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित नाही; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील)

कधी : सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील. पनवेल-ठाणे अप आणि डाऊन मार्गावरील ट्रान्स हार्बर मार्गावरील, नेरुळ-खारकोपर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहील. ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर- खारकोपर दरम्यान लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालतील. ब्लॉक काळात सीएसएमटी - वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

कुठे : सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकाच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर चालविण्यात येईल. तर, अप आणि डाऊनच्या काही फेऱ्या रद्द केल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव; सूर्य थेट डोक्यावर आल्याने काही क्षण सावलीच गायब

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT