Mumbai Rain Update 
मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा तडाखा! अंधेरी सबवे, चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात साचले पाणी

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे

Sandip Kapde

Mumbai Rain Update: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मागील आठवडाभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. काल रात्री पावसाने काही उसंत घेतली असतानाच, आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या रेड अलर्टनंतर आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील अनेक भागात पाणी तुंबण्याची स्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) काळजी घेण्याते आवाहन केले आहे.

अंधेरी सबवेवर पाणी साचले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात देखील पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वसईमधील सनसिटी रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. १० दिवसांपासून रस्ता पाण्याखाली गेला आहे. मात्र पाणी ओसरत नाही आहे. हा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. मात्र तरी देखील लोक रस्त्यावरुन वाहने चालवत आहे. (Mumbai Rain Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT