Mumbai Rain Update 
मुंबई

Mumbai Rain Update: किंग्ज सर्कल, अंधेरी सबवेवर साचलं पाणी; सबवे वाहतुकीसाठी बंद

Sandip Kapde

Mumbai Rain Update: हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील एक तासापासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील पाण्याने संपूर्ण भरलेला असून साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे.

त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. (rain update)

मुंबईसह- उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले  आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT