Mumbai Rain Update esakal
मुंबई

Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

सलग तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा (Mumbai Rain) जोर वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सलग पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबई : सलग तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा (Mumbai Rain) जोर वाढला आहे. काल दिवसभर दमदार कोसळलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. पावसाने दुपारनंतर काहीशी विश्रांती घेत आपली रिमझिम सुरू ठेवली होती.

त्यामुळं रस्ते आणि रेल्वे वाहतूकही मंदावली होती. येत्या दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (Meteorology Department) दिला आहे. गेल्या रविवारी आणि सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता.

सलग पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. सायन येथील गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, अंधेरी, मालाड, मानखुर्द, वाशी नाका आदी सखल भागांत पाणी साचले. दुपारनंतर काहीशी उसंत घेत पावसाने आपली रिमझिम सुरू ठेवली होती.

वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. या पावसात मुंबईतील चौपाट्या, समुद्र किनाऱ्यांवर तरुणाईने गर्दी करीत आनंद लुटला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती.

पावसाची नोंद

  • शहर - १७.४४ मि.मी

  • पूर्व उपनगर - २२.५५ मि.मी

  • पश्चिम उपनगर - १८.८७ मि.मी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT