मुंबई

Mumbai Rain: मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत काल रात्री 8 च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर वाढून काही मुंबईसह ठाणे,नवी मुंबई आणि रायगड मधील काही भागात पाऊस बरसला.

प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार आज विदर्भ, आसपासच्चा परिसर आणि दक्षिण तसेच मध्य महाराष्ट्रात चक्रीवादळ येऊन धडकले. समुद्रसपाटीपासून 0.9 उंचीवर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

केरळ, कर्नाटक मधून प्रवास करत चक्रीवादळ सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात असून ते उत्तर केरळ किनाऱ्यापासून चक्रीय परिभ्रमण करत कर्नाटक राज्य ओलांडून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रातर दाखल झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि  कोकण आणि गोवा यासह उत्तराखंड, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या गडगडाटासह गारांचा पाऊस पडला.

विलेपार्ले, मालाड येथे पाऊस झाला. या भागात  20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाऊस बरसला. तर पनवेल खारघर परिसरातही पाऊस झाला. नवी मुंबईतदेखील मुसळधार पाऊस झाला.

मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Rain Updates Thane and Navi Mumbai thunderstorms with lightning

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मतचोरी’चा बॉम्ब फोडणाऱ्या काँग्रेसचीच चूक? राहुल गांधींनी आरोप केलेल्या क्षेत्रात उमेदवाराची डबल एंट्री! कोणावर विश्वास ठेवायचा?

Pune Parking Scam : महापालिका वाहनतळांवर पाचपट वसुली; मोटारींना ७० रुपये, तर दुचाकींना ३० रुपये प्रतितास आकारणी

Viral Video : ताशी १८० किमी वेगाने धावली वंदे भारत ट्रेन, इंजिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातून एक थेंबही पाणी सांडले नाही, पाहा व्हिडिओ

Leopard Viral Video : गाईला बघून घाबरला बिबट्या, सीसीटीव्ही फुटेज पाहून म्हणाल; कोल्हापुरी नाद खुळा...

Latest Marathi Live Update News: कोरेगाव पार्क अपघाताच्या पाठोपाठ पुण्यात आणखी एक भीषण अपघात

SCROLL FOR NEXT