theater sakal
मुंबई

Ranichi Baug Mumbai : राणीच्या बागेत ७५० आसन क्षमतेचे नवे नाट्यगृह सुरू

राणीच्या बागेत नवे नाट्यगृह पालिकेने बांधले आहे. या नाट्यगृहात चारचौघी या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आरामदायी ७५० आसन क्षमता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्युत रोषणाई, नाट्य रसिकांसाठी सोयीसुविधा असे सुसज्ज नाट्यगृह भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात सुरू झाले आहे. या नाट्यगृहाला लोकशाही अण्णा भाऊ साठे नाट्यगृह असे नाव देण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी हे नाट्यगृह खुले झाले आहे.

दक्षिण मुंबईत हे नवे नाट्यगृह पालिकेने बांधले आहे. या नाट्यगृहात चारचौघी या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली रंगभूमीवरील प्रकाशयोजना आणि ध्वनी व्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी उंची आणि अंतर, नाट्यगृहात असणाऱ्या सोयी सुविधा आणि अत्यंत कल्पकतेने उभारलेली देखणी वास्तू यामुळे हे नाट्यगृह नाट्यरसिकांना आणि कलाकारांनाही निश्चितपणे आवडेल, असा विश्वास पालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित 'चारचौघी' या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या कलाकारांना अश्विनी भिडे या स्वतः प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत, असे कळल्यानंतर त्यांनी नाट्य प्रयोगाच्या अखेरीस अतिरिक्त आयुक्तांना रंगमंचावर बोलवून पुष्पगुच्छ देत कलाकारांनी महानगरपालिकेचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT