First Case of Mucormycosis in Mumbai sakal media
मुंबई

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत आढळला 'म्युकरमायकोसिस'चा पहिला रुग्ण

First Case of Mucormycosis in Mumbai: 5 जानेवारी रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका 70 वर्षीय व्यक्तीला मुंबईत गेल्या आठवड्यात बुरशीजन्य संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसू लागली होती.

सुरज सकुंडे

First Case of Mucormycosis in Mumbai: भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी सामना करत असतानाच आता मुंबईत म्युकरमायकोसिस (Mucormycosis) किंवा 'ब्लॅक फंगस'चे (Black Fungus) पहिले प्रकरण (First Case) नोंदवले गेले आहे. 5 जानेवारी रोजी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आढळलेल्या 70 वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्यात बुरशीजन्य संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसू लागली होती. या व्यक्तीला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

12 जानेवारी रोजी अशक्तपणाच्या तक्रारीनंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या रक्तातील साखरेची पातळी देखील 532 पर्यंत वाढली होती. हे उपचार चालू असतानाही, काही दिवसांनंतर रुग्णाने गालात वेदना होत असल्याची आणि सूज आल्याची तक्रार केली, जी दवाखान्यात दाखल होताना नव्हती.15 जानेवारीपर्यंत, सूज आणि वेदना मोठ्या प्रमाणात वाढली होती. चाचणीसाठी पाठवलेल्या नाकातील स्वॅबमध्ये देखील बुरशीजन्य हायफेची वाढ उघड झाली होती. ईएनटी सर्जनने केलेल्या डीब्रीडमेंट आणि फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस शस्त्रक्रियेने देखील नाकपुड्यांत काळ्या रंग उघड दिसत होता आणि नेक्रोटिक टिश्यूचा नाश झाला होता.अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि तो इंट्राव्हेनस अँटीफंगल्सवर आहे. त्याला एकापेक्षा जास्त डिब्रीडमेंट्स करावे लागतील आणि दीर्घ कालावधीसाठी अँटीफंगल उपचार आवश्यक असतील.

म्यूकोर्मायकोसिस म्हणजे काय?(What is myocardial infarction?)-

कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत ‘म्युकोरमायकोसिस’ (Mucormycosis) हे ‘फंगल इन्फेक्शन’ (fungal infection) आढळते. कोरोनामुळे प्रतिकारशक्ती तसेच उपचारादरम्यान स्टिरॉईड्सचा मारा यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार वाढतो.

तिसर्‍या लाटेदरम्यान मुंबईतून अशा प्रकारची ही पहिलीच केस नोंदवली गेली असली तरी, शहरात आणि देशाच्या इतर भागांमध्ये मागील वर्षभरात हजारो प्रकरणे पाहिली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT