Mumbai Close Sakal
मुंबई

मुंबई : रस्ते मोकळे, मोजकीच वाहन रस्त्यांवर

महाविकास आघाडीने सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला मुंबईत वाहतुकदारांनीही साथ दिली आहे. टॅक्सी, रिक्षा संघटना अप्रत्यक्षरित्या बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाविकास आघाडीने सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला मुंबईत वाहतुकदारांनीही साथ दिली आहे. टॅक्सी, रिक्षा संघटना अप्रत्यक्षरित्या बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे काहीप्रमाणात रस्ते मोकळे होते. तर मोजक्याच टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर दिसून आल्या, त्यामुळे नौकरदारांना कर्तव्यावर पोहचण्यासाठी त्रास सहन करावा लागला असून, सोमवारचा बंद बऱ्याचप्रमानात यशस्वी झाल्याचे दिसुन आले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोमवारी रस्त्यांवर पहायला मिळाले. लखीमपूर खेरी प्रकरणात तिन्ही पक्षांकडून निषेध करण्यात आला. शिवडीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झंडे दाखवत घटनेचा निषेध केला. शिवाय यामध्ये 75 टक्के पेक्षा रिक्षा, टॅक्सी बंद होत्या तर मालवाहतुकदार सुद्धा बंद मध्ये सहभागी असल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अद्यक्ष बल मलकीत सिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे मुंबईतील व्यापाऱ्यांचा माल सुद्धा बंदमुळे रस्त्यांवर अडकला असल्याचे दिसून आले आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकापुढे दैनंदिन असलेल्या टॅक्सी, रिक्षाची गर्दी सोमवारी दिसून आली नाही. शिवाय लोकल सेवेलाही प्रवाशांची गर्दी नव्हती. दरम्यान शासकीय कार्यालये वगळता खासगी दुकाने, आस्थापना सर्व बंद असल्याने रस्त्यांवर लोकांचीही गर्दी दिसुन आली नसल्याने एकूणच महाविकास आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी होतांना दिसून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT