मुंबई : मोकळ्या मैदानावर ‘शिक्षणाचे पाठ’ sakal
मुंबई

मुंबई : मोकळ्या मैदानावर ‘शिक्षणाचे पाठ’

कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीमुळे शाळांमध्ये शुकशुकाट आहे.

जीवन तांबे - सकाळ वृ्त्तसेवा

कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीमुळे शाळांमध्ये शुकशुकाट आहे. मुंबईत महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले; मात्र ५० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. घाटकोपर येथील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून स. गो. बर्वे मार्गावरील पालिका माध्यमिक विभागांचे मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांनी पुढाकार घेतला.

शिक्षकांसह परिसरात फिरून मगर यांनी मुलांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी व विज्ञान आदी विषय समजणे अवघड जाते. या विषयांचे नीट आकलन व्हावे, यासाठी मुख्याध्यापक मगर यांनी पालिकेच्या मोकळ्या मैदानात वर्ग घेण्यास सुरुवात केली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

या शाळेत हिंदी, मराठी माध्यमाच्या एकूण तीन तुकड्या आहेत. त्यात इयत्ता ९ वीत ३०० पेक्षा अधिक व इयता १० मध्ये ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. कोरोना नियमांचे पालन करून प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी मोकळ्या मैदानात बसवून शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देतात. कोरोना नियमावली पाळण्यासाठी विद्यार्थ्यांची सहा गटांत विभागणी करण्यात आली आहे. गजानन घाटे, अशोक शेंडे, दिलीप भाटे, मनोज भोकरे, बबन गायकवाड या शिक्षकांनी मगर यांच्या मोहिमेला मोलाची साथ दिली आहे.

महापालिका शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वसामान्य घरातील आहेत. अनेकांच्या घरी मुले दोन, तरी मोबाईल एकच आहे. त्यामुळे अशी मुले ऑनलाईन वर्गापासून वंचित राहतात. दोन तासांत काही विद्यार्थ्यांना अभ्यासही नीट समजत नाही. अशा विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात बोलावून त्यांना मार्गदर्शन केले जाते.

- अंबरसिंग मगर, मुख्याध्यापक, पालिका शाळा, घाटकोपर

पालिका शाळेतील शिक्षक मोकळ्या मैदानावर राबवत असलेल्या उपक्रमाचा आम्हाला फायदा होत आहे. शिक्षक सोप्या पद्धतीने गणित व विज्ञान, इंग्रजी आदी विषय शिकवितात. या ठिकाणी शंकांचे समाधानही होते.

- दीक्षा आंबड, विद्यार्थिनी

टाळेबंदीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे; परंतु ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन वर्गच उत्तम आहेत. ऑनलाईन शिक्षण सर्वांनाच शक्य नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत, त्यांना हे शिक्षक शिकवितात. हा उपक्रम स्तुत्य आहे.

- संजय जाधव, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT