मुंबई: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second wave)लहान मुलेही बऱ्यापैकी बाधित झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण जास्त होते. अनेक लहान मुलांचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला. मुंबई सेंट्रल येथील बी.वाय. एल. नायर रुग्णालयात (nair hospital) कोविड पॉझिटिव्ह माता आणि लहान मुलांवर कोविडचे उपचार केले जातात. इथे दाखल झालेल्या ४३ लहान मुलांपैकी चार लहान मुलांचा ३० एप्रिलपर्यंत मृत्यू झाला. (Mumbai Second wave claims more kids hospitalisation rate 1.5 times higher this year)
२०२० मध्ये कोरोनामुळे चार लहान मुलांचा मृत्यू झाला होता. चारपैकी तीन मृत्यू अर्भकांचे होते, तर एक मुलगा ११ वर्षांचा होता. चालू वर्षाच्या मार्च-एप्रिल महिन्यात परेलच्या वाडिया रुग्णालयात कोरोनामुळे पाच लहान मुलांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये वाडिया रुग्णालयात कोरोनामुळे तीन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. पहिल्या लाटेत मे-जून महिन्यात वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे ७६ लहान मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये १०३ मुलांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महालक्ष्मी येथील लहान मुलांच्या SRCC हॉस्पिटलमध्ये यावर्षी कोरोनामुळे पहिल्या अर्भकाच्या मृत्यूची नोंद झाली. पहिल्या लाटेत इथे एकही मृत्यू झाला नव्हता. महापालिकेच्या डाटानुसार, मागच्यावर्षीपासून १० वर्ष वयोगटाच्याआतील ११,०८० लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली. त्यात १७ लहान मुलांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दीड ते दोन पट जास्त आहे, असे नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुष्मा मलिक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.