Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवलीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा बॅनर फाडला...

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली : शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याचे वादळ अद्याप शमले नसतानाच डोंबिवलीत घडणाऱ्या घडामोडींमुळे या वादाला वेगवेगळे तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने डोंबिवली पूर्वेला संजय राऊत यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनर वरील संजय राऊत यांच्या फोटोवर अज्ञात इसमाने वार करून हा बॅनर फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या वतीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा खोडसाळ पणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत असून यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

विविध उत्सवाच्या निमित्ताने शहरात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. डोंबिवली पूर्वेला पेंडसेनगर परिसरात यादव डेअरी जवळ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी संजय राऊत यांना समर्थन देणारा तसेच नवरात्रीच्या शुभेच्छा देणारा कापडी बॅनर लावला होता. या बॅनरवर पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सह अनेक स्थानिक मोठ्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत होते.

एका अज्ञात इसमाने गुरुवारी रात्री या बॅनर वरील राऊत यांच्या फोटोवर वार करीत हा फोटो फाडला आहे. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती उपशहर प्रमुख तेलगोटे यांना कळवली. त्यांनी तातडीने ही बाब शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांना सांगितली. त्यानंतर प्रकाश तेलगोटे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या खोडसाळ आणि घाणेरड्या कृतीचा शिवसेनेचे वतीने आम्ही जाहीर निषेध करीत असून पोलीस प्रशासनाने देखील सदर घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केली आहे.

बॅनर वरील खासदार राऊत यांचा फोटो फडण्यात आल्याने हा खोडसाळपणा विरोधी गटाने केलया असल्याची चर्चा ठाकरे गटात रंगली आहे. एकीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील दसरा मेळाव्यातील वाद अद्याप मावळला नसून डोंबिवलीत घडणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे याला वेगळे राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Shirur Lok Sabha: शिरुरमधील मतदाराला मतदानावेळी आली अडचण, थेट शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता; नेमकं काय झालं होतं?

KL Rahul: जो बुंद से गई वो... प्रेक्षकांसमोर झापल्यानंतर राहुलबरोबर संजीव गोयंकांचे डिनर कोणालाच पचेना

Marathi News Live Update: बेकायदा होर्डिंगविरोधात २४० तक्रारी, पण कारवाई नाही; उदय सामंत यांचा आरोप

SCROLL FOR NEXT