Vaccine
Vaccine Sakal
मुंबई

मुंबई: रहिवाशांनी लसीच्या नावाखाली डिस्टिल्ड वॉटरचे डोस घेतले?

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईतील बनावट लसीकरण घोटाळ्याचा (fake vaccination racket) तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai police) विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. लसीच्या नावाखाली डिस्टिल्ड वॉटर म्हणजे प्रक्रियायुक्त पाण्याचे डोस (distilled water) देण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. डीसीपी विशाल ठाकूर या प्रकरणाचा तपास करत आहेत. या बनावट लसीकरण घोटाळ्यात काही जणांना अटक करण्यात आली असून ही एक टोळी आहे. त्यांनी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटमधून ३८ बाटल्या मिळवल्या होत्या. विविध ठिकाणी बनावट लसीकरण शिबीरासाठी या रिकाम्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. (Mumbai SIT to probe fake vaccination racket suspected of using distilled water in vials)

या वायल्सच्या खरेदीमध्ये डॉ. मनिषा त्रिपाठीने मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे. या टोळीने रिकाम्या बाटल्या मिळवल्या व त्याचा हिरानंदानी हाऊसिंग सोसायटीसह अन्य ठिकाणी बोगस लसीकरणासाठी वापर केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

त्या रिकाम्या बाटल्यांमध्ये काय भरलं होतं?

त्या रिकाम्या बाटल्यांमध्ये डिस्टिल्ड वॉटर म्हणजे प्रक्रियायुक्त पाणी भरल्याचा पोलिसांना संशय आहे. या डिस्टिल्ड वॉटरमुळे कुठलेही नुकसान होत नाही. रहिवाशांनी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेतोय समजून, डिस्टिल्ड वॉटरचे डोस घेतले.

बोगस लसीकरणाप्रकरणी टोळीला मदत केल्याच्या आरोपाखाली कांदिवली पोलिसांनी एका रुग्णालयाचा मालक व त्याच्या पत्नीला गुरूवारी अटक केली. या प्रकरणी 24 तासांत बोरीवली, बांगूरनगर व भोईवाडा येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बनावट लसीकरणाची गुन्ह्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. कांदिवली बोगस लस प्रकरणात आरोपींना लस पुरवण्यात मदत केल्याचा आरोपाखाली एका रुग्णालयाच्या मालकाला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. हा मालक डॉक्टर असून त्याच्या पत्नीलाही या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT