Mumbai SNDT's Youth Festival concludes with a bang  sakal
मुंबई

Mumbai: एसएनडीटीचा युवा महोत्सव जल्लोषात संपन्न

Mumbai SNDT Collage Latest News | कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

सकाळ डिजिटल टीम

Latest Mumbai News: एसएनडीटी विद्यापीठाचा युवा महोत्सव नुकताच पार पडला.या महोत्सवा अंतर्गत संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य या विषयांतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या. दोन टप्प्यांत पार पडलेल्या या म्होत्सवात महाराष्ट्र आणि गुजरातमधील ११७९ विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.दरवर्षीची परंपरा राखत एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एसीबी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स विद्यार्थिनींचा

युवा महोत्सवाची ट्राफी पटकावली. कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

२० व २१ सप्टेंबरला एसएनड़ीटी युवा महोत्सवाची धामधूम सुरु होती. एम.एम.पी. शहा महाविद्यालय माटुंगा येथे ललित कला, साहित्य आणि नृत्य या स्पर्धा पार पडल्या, अभिनेत्री श्रद्धा पोखरणकर, प्राचार्य डॉ.

अर्चना पत्की यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. ललित कला अंतर्गत कार्टूनिंग,कोलाज, पोस्टर, रांगोळी, शिल्पकला आणि फोटोग्राफी या स्पर्धांमधून एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एस. सी. बी. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ललित कलेची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली. साहित्य विषयांतर्गत निबंध,भाषण, वादविवाद ,कविता वाचन या स्पर्धा घेण्यात आल्या.

साहित्य आणि ललित कलांप्रमाणेच नृत्यातही महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्याची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावून मणिपुरी, भरतनाट्यम् यासोबत लोकनृत्यातही उत्तम सादरिकरण केले. स्पर्धेचा दुसरा टप्पा २६-२७ सप्टेंबरला चर्चगेट येथे विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डॉक्टर रुबी ओझा यांच्या उपस्थितीत पार पडला. या दोन दिवसांमध्ये संगीत व नाट्य या विषयांतर्गत शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, सुगम संगीत, भारतीय व पाश्चात्य समूहगीत इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. नाट्य या विषयांतर्गत एकांकिका,मिमिक्री, माईम,पथनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधूनही अतिशय मेहनत घेऊन सादर केलेले प्रयोग यशस्वी ठरले व विद्यार्थिनींनी प्रयत्नपूर्वक नाट्याची चॅम्पियन ट्रॉफी मिळाली.

अशाप्रकारे संगीत,नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य या सर्वच विषयांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सर्वश्रेष्ठ ठरल्या. जवळजवळ 50 गुणाधिक्याने युवा महोत्सवाची ट्रॉफी मिळविण्याचा मान महाविद्यालयाला मिळाला. महाविद्यालयाला मिळालेल्या या घवघवीत यशाचे श्रेय संस्कृतिक अध्यक्ष डॉक्टर नम्रता गणेरी व प्राचार्या प्रो. जास्वंदी वांबूरकर यांनी विद्यार्थिनींना व शिक्षकांना दिलेले प्रोत्साहन व पाठिंब्यास जाते.

...

या महोत्सवामुळे माझ्या छंदांना उदंड प्रतिसाद मिळाला आणि यामुळे मर्यादित न राहता त्या पलीकडे जाऊन खूप गोष्टी नव्याने अनुभवल्या.

साक्षी वाघमारे,विद्यार्थिनी

..

आमच्या कॉलेजने २६ पैकी २५ स्पर्धात भाग घेतला व पुरस्कार जिंकले.गेल्या दोन दशकापासून सर्वाधिक ट्राफी जिंकण्याचा विक्रम आम्ही सुरु ठेवला आहे.

डॉ. नम्रता गणेरी,- सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक.

…..

युवा महोत्सव हा विद्यार्थिनींना आपल्यातील कलागुणांना विकसित करण्याची संधी प्रदान करतो.आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींवर प्राध्यापक खुप मेहनत घेतात.त्याचे फलित म्हणून इतक्या मोठ्या संख्येने हे पुरस्कार महाविद्यालयाला मिळालेले आहेत.

डॉ. जास्वंदी वांबूरकर- प्राचार्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT