ST bUS Sakal Media
मुंबई

एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Bus Corporation) सखोल स्वच्छतेच्या उपक्रमाला खुद्द महामंडळाच्या मुख्यालयातील मुंबई डेपो (Mumbai Bus Depot) व्यवस्थापकांनीच हरताळ फासला आहे. मुंबईसह बाहेरून येणाऱ्या लांब पल्ल्यावरील बसेसची स्वच्छताच होत नसून, अस्वच्छ बसेसमधूनच प्रवाशांना (Bus travelers) प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST Employee) नाव न लिहिण्याच्या अटीवर या घटनेचा खुलासा झाला असून, ऐन महामारीच्या काळात एसटी प्रवाशांना रोगराईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ( Mumbai ST Corporation ignores Cleanliness of ST buses campaign harmful to travelers)

एसटी प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वछता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बसेसचे डीप स्वच्छता करण्यात येणार होती. दरवाजे, खिडक्या, फाटलेली आसने दुसस्त करण्यापासून, बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. विशेषतः कोविड महामारीच्या नंतर सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी लोक अजूनही म्हणावे तितके धाडस करत नाहीत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्या वाहनाची किंवा बसेसची स्वच्छता हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत बसेसची सखोल स्वच्छता नावाची संकल्पना आगार पातळीवर राबवण्याचे ठरवले होते.

मात्र, एसटी मुख्यालयाच्या डेपो व्यवस्थापकांनीच बसेस स्वछता बंद केल्याने राज्यभरातील सखोल स्वच्छतेची काय स्थिती असेल याचा अंदाज येत आहे.सध्या मुंबई सेंट्रल आगारातील प्रवाशांना मात्र, अस्वच्छ बसेसमधून आपला धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे सांगितलं जात आहे. यासंदर्भात मुंबई सेंट्रलचे आगार व्यवस्थापक बच्छाव यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष

एसटी मुख्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून वेळोवेळी सखोल स्वच्छता करण्याच्या सूचना आगार प्रमुखांना दिल्या जात असते. मात्र, त्या सूचनांचे पालन होत नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊन, महामारीच्या काळात अस्वच्छ बसेसमधून प्रवास करावा लागतो आहे.

प्रवासी संख्येला खीळ बसण्याची शक्यता

अस्वच्छ बसमधील प्रवासामुळे प्रवासी वाढण्यापेक्षा घटण्याची जास्त शक्यता आहे. आधीच गेल्यावर्षी पासून एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा बंद होती. त्यामुळे प्रवासी संख्येसह उत्पन्नातही घट होऊन कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. मात्र, महामंडळाने प्रवाशांना महामारीच्या काळात उत्तम सुविधा न दिल्यास पुन्हा प्रवासी संख्या घटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT