mumbai sakal
मुंबई

Mumbai : कचऱ्याच्या वर्गीकरणाला ठेंगा; पालिका कर्मचाऱ्यांकडूनच नियम धाब्यावर

पुणे शहरात घरोघरी निर्माण होणारा कचरा ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून संकलित करण्याची व्यवस्था आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, यासाठी आग्रही असणाऱ्या पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या नियमाला ठेंगा दाखवला आहे. सर्रासपणे मिश्र कचरा वेचकांच्या ताब्यात दिला जात आहे.

त्यामुळे नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलणाऱ्या महापालिकेतच ‘दिव्याखाली अंधार’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरात घरोघरी निर्माण होणारा कचरा ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून संकलित करण्याची व्यवस्था आहे. पूर्वी नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा एकत्रित करून दिला जात होता, त्यानंतर कचरावेचक रस्त्यावर बसून कचरा वर्गीकरण करून तो प्रकल्पावर पाठवत होते.

यामुळे कचरा वेचकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने महापालिकेने नागरिकांना ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सक्ती केली. नागरिकांनीदेखील त्यास प्रतिसाद दिला.

नागरिकांना मात्र दंड

सध्या शहरात संकलित होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ८० टक्के कचरा वर्गीकरण केलेला आहे. त्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये व्यवस्थित काम होत आहे. जे नागरिक मिश्र कचरा देतात, त्यांचा कचरा न स्वीकारणे, दंड करणे अशी कारवाई केली जात आहे.

महापालिकेत निर्माण होणारा ओला. आणि सुका कचरा एकत्रित देणे चुकीचेच आहे. हा प्रकार बंद व्हावा यासाठी सर्व विभागप्रमुखांना आदेश देऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वर्गीकरण केले जावे, या संदर्भातील परिपत्रक काढले जाईल.

- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा विभाग

नेमके काय होते?

महापालिका भवनाच्या इमारतीत हजारो कर्मचारी काम करतात.

त्यांच्या डब्यातील शिल्लक खाद्यपदार्थ, चहापत्ती, फुले असा ओला कचरा होतो.

कार्यालयातील रद्दी, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या यांचा सुका कचरा होतो.

त्याचे कर्मचाऱ्यांनी वर्गीकरण करून देणे आवश्यक आहे.

प्रत्येक कार्यालयातून मिश्र कचरा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला जातो.

स्वच्छता करणारे कर्मचारी पार्किंगमध्ये बसून या कचऱ्याचे वर्गीकरण करतात

याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभाग अंधारात असल्याचे समोर आले आहे.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान। आपण कोरडे पाषाण॥

तेणें ज्ञान कां सांगावें। ज्ञानासारिखें वर्तावें॥

संत तुकाराम महाराजांनी दिलेला हा उपदेश महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवावा. नागरिक नियमांचे पालन करत असताना ज्यांनी नियम तयार केले त्यांनीच नियमांना केराची टोपली दाखविणे योग्य होणार नाही.

खरं तर ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ म्हणत महापालिका कर्मचाऱ्यांनीच कचरा वर्गीकणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT