Mumbai Suicide loco pilot Kalyan discussion crime police investigation Sakal
मुंबई

Mumbai: कल्याणमध्ये 'लोको पायलट'ची आत्महत्या; मात्र चर्चा अशी आहे की...

ते मुंबई रेल्वेत लोको पायलट म्हणून काम करत होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या सुजित कुमार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

सुजित यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कर्मचारी बोलत आहेत.

सुजित कुमार हे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रहाण्यास होते. ते मुंबई रेल्वेत लोको पायलट म्हणून काम करत होते. सुजितने प्रशिक्षण पूर्ण केले होते, त्यात तो पासही झाला होता. पण नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला ड्युटीवर घेतलेच नाही. तब्बल तीन महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आले होते.

सुजित कुमार याला सप्टेंबर महिन्यापर्यंत निलंबित केले गेलं आहे. आर्थिक परिस्थिती खराब झाल्यावर त्याने असे पाऊल उचलले असावे असे लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या हरिश चिंचोले यांनी सांगितले. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी याच कारणामुळे सुजित याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळवणूक सुरु असल्याचा आरोप देखील केला आहे.

सुजित कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला आहे. यावेळी रुग्णालय परिसरत तसेच रेल्वे मोटरमन कार्यालयाच्या बाहेर रेल्वे कर्मचारी गोंधळ घातला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

कारवाई होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे पोलिस व आरपीएफ जवानांनी जमावास पांगवले. यानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

मला डावललं गेलं, मी फोन केले तरीही... अभिनेत्याने सांगितलं 'पारू' मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाला- त्यांनी मला...

Cough Syrup For Kids: लहान मुलांना कफ सिरप देताय? थांबा...ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा

"तू महाराष्ट्राचा बिहार केलास.." मराठी अभिनेत्याचे गौतमी पाटीलला खडेबोल "साधी माणुसकी.."

SCROLL FOR NEXT