Surya Regional Water Supply Project
Surya Regional Water Supply Project  
मुंबई

Mumbai : वसई-विरारकरांची तहान भागणार! सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प महिनाभरात सुरु होणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या पश्चिम क्षेत्रातील वसई-विरार पट्ट्यातील २० लाखांहून अधिक रहिवासी आता मोकळा श्वास घेऊ शकतात, कारण त्यांची सततची पाण्याची समस्या लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने आणि उभारण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा येत्या महिनाभरात सुरु होणार असल्याची माहिती एमएमआरडीए महानगर आयुक्त एस. व्हीं. आर. श्रीनिवास यांनी दिली.

मुंबई महानगर प्रदेशाच्या पश्चिम क्षेत्रातील वसई-विरार, मिरा-भाईंदर उपप्रदेश हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी समूहांपैकी एक आहे. साधारणतः शहरे ५ ते१० टक्के विकास दराने वाढतात, पण हा प्रदेश जवळपास  ५० टक्यांहून अधिक विकास दराने वाढत आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) द्वारे शासित क्षेत्रांची लोकसंख्या एका दशकात १२.२२ लाख (२०११) वरून २४ लाख (२०२३) इतकी झाली आहे. लोकसंख्या दुप्पट झाली असताना मात्र पुरेसा पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यात यंत्रणा अपयशी ठरली. परिणामी, पाणी टंचाईमुळे या भागातील नागरिकांवर जलसंकट ओढवल गेलं असल्यामुळे त्यांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत होता.

या संकटाचा फायदा टँकर लॉबीला होत होता. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई ची ही समस्या नागरिकांनी तीव्रतेने भेडसावू लागते. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून ४०३ द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम हाती घेतले. प्राधिकरणाचा हा पहिलाच पाणी पुरवठा प्रकल्प असल्याने तो एमएमआरडीएसाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात वसई - विरार शहर महानगरपालिकेस १८५ द.ल.लिटर तर दुर्या टप्प्यात मिरा - भाईंदर महानगरपालिकेस २१८ द.ल.लिटर पाणीपुरवठा केला जाईल. पहिल्या टप्प्याचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून नागरिकांना जून महिन्यात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली जाईल.

तसेच दुसऱ्या टप्प्याचे काम देखील प्रगतीपथावर असून हा टप्पा पूर्ण झाल्यास मीरा-भाईंदर महानगर पालिकेमार्फत नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या दोन पालिका क्षेत्रांची तहान सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पामुळे भागणार असल्याने आता नागरिकांचा स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

प्रकल्पातील घटक :

४३२ द.ल.लि. क्षमतेचे भव्य उदंचन केंद्र

४१८ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र

८०.७१ कि.मी. लांबीची भुमिगत जलवाहिनी

१.७ कि.मी. लांबीचा मेंढवणखिंड येथील बोगदा

४.४५ कि.मी. लांबीचा तुंगारेश्वर येथील बोगदा

३८ एम. एल. क्षमतेची काशीदकोपर येथे पाण्याची टाकी

४५ एम.एल.क्षमतेची चेने येथे पाण्याची टाकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT