Mumbai Taxi Video Sakal
मुंबई

Mumbai Taxi Meter Fraud : मुंबईत टॅक्सीचालकाकडून मीटरचोरी? प्रवाशाकडून Video Viral

प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईमध्ये अनेकदा टॅक्सीचालकाकडून लूट झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही टॅक्सीचालक ग्राहकांना फसवून त्यांच्याकडून जास्त पैसे उकळण्याचे प्रयत्न करत असतात तर बरेच टॅक्सीचालक इमानदारीने काम करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हरकडून मीटर चोरी केल्याचा आरोप प्रवाशाने केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील असून समोर बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये आरोप केला आहे की, "या ड्रायव्हरने गिअरजवळ एक बटण बसवलं आहे आणि तो मध्येमध्ये हा बटण दाबत होता. बटण दाबल्यानंतर मीटरवरील आकडा वाढत आहे आणि ग्राहकांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत."

हा व्यक्ती फसवणूक करत असल्याचा आरोप या प्रवाशाकडून केला जात आहे. त्याचबरोबर त्याने टॅक्सीचा नंबरसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर टॅक्सी चालकाकडून सारवासारव केल्याचा प्रयत्न केला जात आहे. "मी असं काही केलेलं नाहीये" असं हा टॅक्सीचालक या प्रवाशाला सांगताना दिसत आहे.

दरम्यान, आमची मुंबई या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर यावर अनेक मुंबईकरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला असून या टॅक्सीचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT