मुंबई : गाद्या, सतरज्यांसाठी ७५ कोटींची निविदा sakal
मुंबई

मुंबई : गाद्या, सतरज्यांसाठी ७५ कोटींची निविदा

आदिवासी विभागाचा उलटा कारभार ; शाळा सुरू होण्यापूर्वीच इतर साहित्याची खरेदी

- ज्ञानेश सावंत

मुंबई : शाळा उघडून विद्यार्थ्यांना ‘धडे’ देण्याआधीच त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करीत, आदिवासी विकास विभागाने यंदाही उलटा कारभार केल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसताना आणि तिसऱ्या लाटेत मुलांना धोक्याची भीती असूनही जून महिन्यांतच आदिवासी आश्रम शाळांतील ७५ कोटींच्या गाद्या, सतरंज्या, बेड आणि उशा खरेदीची निविदा काढी आणि त्याच महिन्यांत मंजूर करण्याच्या हालचाली केल्या.

मात्र, निव्वळ पैसा कमविण्यासाठी हा विभाग आणि आदिवासींच्या योजनाच ताब्यात घेतलेल्या ठेकेदारांच्या वादात योजना रखडली आहे. परंतु, ठेकेदारांत ‘समेट’ घडवून आणत, महागड्या म्हणजे, साडेपाच हजारांहून अधिक किमत दाखवून ५० कोटींच्या गाद्या आणि २५ कोटींचे इतर साहित्य खरेदीसाठी या विभागाचे अधिकारी धडपड करीत असल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाच्या साथीमुळे फेब्रुवारी २०२० पासून शाळा बंद आहेत.

तरीही, शाळा उघडणार असल्याने ठरवून या विभागाने आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना झोपण्यासाठीच्या साहित्याच्या खरेदीचा निर्णय घेतला आणि निविदा काढली. या विभागाच्या योजनांमधून अमाप नफेखोरीचा उद्देश ठेवलेल्या ठेकेदारांत काम मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्यातून योजनेची गरज, निविदा, त्यातील साहित्य आणि किमतीचा मुद्दा पुढे आला. शाळा बंद असताना या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी साहित्य पुरविणे गरजे होते; त्याऐवजी गरज नसलेल्या साहित्याची खरेदीची घाई का, असा प्रश्न अदिवासी समाज कृती समितीने केला आहे.

दोन वर्षाला गाद्या कशाला?

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना अमलात आणतात. त्यात आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नेमके कोणते आणि याआधी कधी साहित्य खरेदी केले, त्यावरचा खर्च याचा तपशील मात्र लपविला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार साहित्य खरेदीला विरोध नाही; मात्र, गाद्यासारख्या वस्तू दोन-तीन वर्षांनी खरेदी का करावा लागतो, असा प्रश्न विचारला जात आहे.

'शाळा सुरू होण्याच्या शक्यतेने या निविदा काढल्या होत्या. साहित्याचा दर्जा आणि किमती तपासूनच निविदा मंजूर होतील. यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चुकीच्या पद्धतीने काम केलेल्या ठेकेदारांना सामावून घेणार नाही.'

- हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT