prasad lad
prasad lad sakal media
मुंबई

अमली पदार्थांचा व्यापार होताना राज्याचे गृहखाते झोपले होते का ?

कृष्ण जोशी

मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांमधील (Mumbai bombing) आरडीएक्स (RDX) हे गुजरातच्या नव्हे तर कोकण किनाऱ्यावर उतरले होते. इतकेच नव्हे तर मुंबईवर अतिरेकी हल्ला (Mumbai terrorist attack) करणारी कसाबची टोळीदेखील गुजरातमधून नव्हे तर स्कॉटलँड यार्डशी बरोबरी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) नाकाखालून समुद्रमार्गे मुंबईत शिरली होती. या दोन्ही वेळेला राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्या-मंत्र्यांसह काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते, हे मलिक यांनी विसरू नये. आता अमली पदार्थांचा व्यापार होत असताना महाराष्ट्राचे गृहखाते झोपले होते का? असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad Lad) यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) लगावला.

गुजरातमधून अमली पदार्थांचा देशभर व्यापार होत असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना लाड यांनी हे वक्तव्य केले. बॉम्बस्फोट व कसाब हल्ला या दोन अनुभवातून इतक्या वर्षांत काँग्रेसचे नेते व पोलिस प्रशासन काहीच शिकले नसतील तर हे अपयश सध्याच्या सत्ताधाऱ्यांचेच आहे हे ध्यानात ठेवावे. किंबहुना गेल्या दोन वर्षांत याच मार्गाने महाराष्ट्रात अमली पदार्थही येत असतील व त्याचे खापर मात्र सत्ताधारी पक्ष गुजरातवर फोडत आहे, असा आरोप लाड यांनी केला.

गुजरातमधून देशभर अमली पदार्थांचा व्यापार होत असेल तर महाराष्ट्राचे पोलिस व गृहखाते काय करीत आहे, याचे उत्तर मलिक यांनी द्यावे. मुंबईतून जाणारे अभिनेते पुत्र आणि वजनदार व्यक्ती क्रूझवर ड्रगपार्टी करतात. मात्र राज्याच्या पोलिसांना त्याची गंधवार्ताही नसते. केंद्रीय यंत्रणा येऊन हा कट उधळून लावतात. हे राज्याच्या गृहखात्याचे धडधडीत अपयश आहे. अन्य राज्यांमधून अमली पदार्थ महाराष्ट्रात येतात असा आरोप करणाऱ्यांनी, महाराष्ट्र पोलीस या व्यापाराला अटकाव का करीत नाहीत, हा व्यापार उधळून का लावीत नाहीत, याचे आत्मपरीक्षण करावे, असे लाड म्हणाले.

गौतम अदानींची पाठराखण

अदानींच्या बंदरात अफगाणिस्तानातून आलेला मोठा अमली पदार्थांचा साठा सापडला. त्यानंतर अदानींनी देशातील आपल्या सर्वच बंदरांमध्ये इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातून कंटेनर आणण्यास बंदी केली आहे. हे देखील अदानींवर आरोप करणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे, असे म्हणत लाड यांनी उद्योजक गौतम अदानींची पाठराखण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT