show cause notice  Google
मुंबई

मुंबई-ठाण्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा

आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांमधील कुरघोडी चव्हाट्यावर

संजीव भागवत

मुंबई : एप्रिल ते ऑगस्ट या काळात अन्न नमुने (Food samples) कमी करण्यात आल्याचे सांगत अन्न व औषध प्रशासनाच्या (Food and medicine department) आयुक्तालयाने मुंबई आणि ठाण्यातील (Mumbai and thane) अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा (Show cause notice) बजावल्या आहेत. यात मुंबईचा काही अपवाद वगळता ठाण्यातील अधिकाऱ्यांनाच टार्गेट करण्यात आल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे. दुसरीकडे यासाठी जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र मोकाट सोडल्याने याविषयी उलटसूलट सुरू झाल्या आहेत.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नोटीसी बजावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या उपस्थित नुकतीच एक बैठक झाली त्या बैठकीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून याविषयीची माहिती देण्यात आली. मुंबईतील बहुतांश अधिकाऱ्यांचेही कोरोनाच्या कामात गुंतल्याने टार्गेट पूर्ण नसताना २५ पैकी केवळ ३ अधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या तर अशीच परिस्थिती ठाण्यातील अधिकाऱ्यांची असताना येथील अधिकाऱ्यांसोबत दुजाभाव करत सरकट म्हणजेच ४३ पैकी ४२ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

टार्गेटसाठी परिपत्रकच नाही

ज्या अधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यापूर्वी त्यांना मेमो देणे आवश्यक असतानाही सांगितलेले असतानाही आयुक्त कार्यालयाने नियम धाब्यावर बसवून या नोटीसा बजावल्याचे अधिकारी सूत्राने सांगितले. तर सर्वात गंभीर बाब म्हणजे, प्रत्येक वर्षांत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अन्न नमुन्यासाठी टार्गेट देण्यात येते, या टार्गेटसंदर्भात कोणतेही परिपत्रक यंदा जारी करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले.

कुरघोडी चव्हाट्यावर

यंदा राज्यात एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत हे अधिकारी कोरोनासंदर्भातील अनेक कामकाजात होते. त्यांना याच कालावधीतील अन्न नुमने कमी झाल्याचे सांगत कारणे दाखवा नोटीशीमुळे बजावल्या. यामुळे विभागातील अधिकाऱ्यांमधील कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे.

"मुंबईत कार्यरत असलेल्या २५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी ३ जणांना तर ठाण्यात असलेल्या ४३ पैकी तब्बल ४२ जणांना या कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अन्न नमुन्यांसाठी टार्गेट देण्यात येते,दरवर्षी टार्गेट ठरलेले असते. मात्र सध्या त्यासाठी कोणतेही परिपत्रक नाही. ज्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत, त्यांनी आपली बाजू मांडावी."

- शैलेश आढाव, सहआयुक्त, मुख्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी वेळ बदलली, आता मालिकाच बंद होणार; फक्त ८ महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका, पोस्ट व्हायरल

Switzerland Bar Explosion : नवीन वर्ष साजरं करतानाच बारमध्ये भीषण स्फोट; अनेक पर्यटक ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

Satara Accident : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी; कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

SCROLL FOR NEXT