Chirbilat Ambulance 
मुंबई

Mumbai : किलबिलाट अ‍ॅम्ब्युलन्स उपक्रम लवकरच राज्यभर सुरु होणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गर्भवती माता आणि बालके यांच्यासाठी आल्हाददायक वातावरण असलेल्या किलबिलाट अ‍ॅम्ब्युलन्सचे आज येथे उद्घाटन करण्यात आले. लवकरच ही सेवा राज्यभर सुरु होईल, असेही सांगण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गर्भवती माता आणि बालकांना सुविधा मिळणार असून, ज्या बालकांना कोणी पालक नाही अशा बालकांचे पुनर्वसन करणे, त्यांना योग्य उपचार मिळवून देणे, ही सेवा प्राधान्याने दिली जाईल.

महिला व बालविकास विभाग, जिल्हा नियोजन विभाग आणि मुंबई महापालिका यांच्यातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातेत त्यांनी किलबिलाट अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत आणि महाराष्ट्र राज्यात ही सेवा सुरू करण्यात येत असून मुंबईत पाच अँब्यूलन्स येतील व नंतर या सेवेचा राज्यभर विस्तार होईल, असे लोढा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT