मुंबई

Mumbai Theft : लॉकर फोडायला गेले अन् कटरचाच संपला गॅस ; चोरट्यांच्या हाती मोजकाच मुद्देमाल !

Mumbai Theft : चोरटे नेपाळचे असल्याची प्राथमिक माहिती

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Theft : ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्यासाठी त्यांनी त्याच लाईन मध्ये असलेले एक दुकान भाड्याने घेतले. त्या दुकानात मोबाईल शॉप सुरु केले. प्लॅन नुसार शुक्रवारी मध्यरात्री दोन दुकानांना भगदाड पाडून त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. शोकेस मधील दागिने त्यांनी चोरल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुख्य लॉकर कडे वळविला.

गॅस कटरने लॉकर तोडत असताना गॅस बंद झाला नी त्यांचा चोरीचा प्रयत्न असफल झाला. केवळ शोकेसमधील दागिन्यांवर त्यांनी शेवटी समाधान मानत तेथून पसार झाले. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोड परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडून त्यातील शोकेस मधील सोन्या चांदिचे दागिने लंपास केले आहेत. शनिवारी सकाळी दुकानाचे मालक अशोक मोहिते जेव्हा दुकानात आले. तेव्हा त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले.

दुकानाच्या आत जाऊन त्यांनी पाहिले असता त्यांना गॅस कटर आणि सिलेंडर, तसेच दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पडल्याचे दिसून आले. त्यांनी दुकाना तील लॉकर तपासला असता मुख्य लोकर चोरटे फोडू शकले नव्हते दुकानाच्या शोकेस मधील दागिने मात्र घेऊन त्यांनी पळ काढला होता याप्रकरणी दुकान मालकांनी त्वरीत खडकपाडा पोलिसांना याची माहिती दिली. दुकानातील सीसीटीव्ही ची वायर चोरट्यांनी काढून टाकली होती.

मोहीते यांंनी पाहिले असता शेजारच्या दोन दुकानांच्या भिंतींना भगदाड पाडून चोरटे ज्वेलर्सच्या दुकानात शिरले होते. त्यांच्या दुकानांच्या रांगेतील दोन दुकाने सोडून तरुणांनी काही दिवसांपूर्वीच मोबाईल शॉप तेथे सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी तो गाळा भाड्याने घेतला होते. हे दुकान शनिवारी उघडले गेले नाही,

तसेच ते तरुण देखील गायब आहेत. त्यामुळे याच तरुणांनी ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जो गाळा या तरुणांनी घेतला होता, त्या गाळ्याच्या भिंतीला ही भगदाड पाडलेले आहे.

सीसीटिव्ही ची वायर काढण्याआधीचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

हे चोरटे नेपाळचे असल्याची प्राथमिक माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली असून दुकान, घर भाड्याने देताना अजून ही निष्काळजीपणा केला जात असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT