Mumbai Traffic advisory  esakal
मुंबई

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Traffic advisory : आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यादरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यादरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईतील रहिवाशांसाठी 17 मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत आणि पर्यायी मार्ग वापरण्याबाबत एक सर्वसमावेशक सूचना जारी केली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी आज (17 मे) दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जाहिर सभे'मुळे मुंबईकरांसाठी संभाव्य वाहतूक कोंडीबद्दल तपशीलवार सूचना जारी केल्या आहेत.

"१७ मे रोजी शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित 'जाहिर सभे'च्या दृष्टीने मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, आणि मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. WEH आणि EEH वर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून वाहतूक व्यवस्था करण्यात येईल. यांसबधीची एक पोस्ट वाहतूक पोलिसांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरती शेअर केली आहे.

"विमान किंवा ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन केले पाहिजे आणि वेळेवर गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी गैरसोय टाळली पाहिजे," असेही वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. सभेमुळे दादरमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग तयार केले आहेत. तर काही मार्ग बंद केले आहेत.

वाहने उभी करण्यास कुठे प्रतिबंध आहे?

1. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम

2. संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर.

3. संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजीपार्क, दादर

4. एन. सी. केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजीपार्क, दादर.

5. टी. एच. कटारीया मार्ग : गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम.

6. पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजीपार्क रोड नं. ५), शिवाजीपार्क, दादर,

7. दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजीपार्क, दादर

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)

9. टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, माटुंगा (पूर्व) १२. खान अब्दुल 10. गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपूर चौक ते बिंदू माधव ठाकरे चौक.

11. थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.

12. डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.

13. दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड, शिवाजीपार्क, दादर.

14. एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम.

पर्यायी मार्ग कोणते?

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन

पर्यायी मार्ग - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एस. के. बोले रोड, आगार बाजार,

पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा.

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी येस बँक जंक्शन ते सिध्दिविनायक मंदिर जंक्शन

पर्यायी मार्ग दांडेकर चौक येथे डावे वळण घेऊन पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT