Anant Ambani-Radhika Merchant’s wedding Sakal
मुंबई

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हायप्रोफाईल लग्न सोहळा पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हायप्रोफाईल लग्न सोहळा पार पडणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथं जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुंबई पोलिसांकडून या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. (Mumabi Traffic Ambani Wedding traffic changes avoid on going these routes)

मुंबई पोलिसांनी वाहतुकीतील बदलाबाबत काढलेल्या पत्रकानुसार, ५ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून मध्य रात्रीपर्यंत तसेच १२ ते १५ जुलै या काळात दुपारी १ वाजल्यासपासून मध्यरात्रीपर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. यासाठी कुर्ला एमटीएनएल रोडवरुन लक्ष्मी टॉवर जंक्शनच्या माध्यमातून धीरुभाई अंबानी स्क्वेअर अन्व्हेन्यू लेन क्रमांक ३, इंडियन ऑईल पेट्रोल पंप आणि डायमंड जंक्शनपासून हॉटेल ट्रायडंटपर्यंत जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

याशिवाय वन बीकेसीतून येणाऱ्या वाहनांना लक्ष्मी टॉवर जंक्शनवर डाव्या बाजुला वळावं लागेल. तसंच डायमंड गेट क्रमांक ८ वर जाऊन नंतर नाबार्ड जंक्शनवर डाव्या बाजुला वळावं लागेल. तिथून पुढे डामंड जंक्शनपर्यंत जाऊन धीरुभाई अंबानी स्क्वेअर आणि इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या माध्यमातून बीकेसीच्या दिशेन जावं लागेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेंद्र मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांची १२ जुलै रोजी लग्न सोहळा पार पडणार आहे. यानंतर १३ जुलै रोजी आशीर्वाद सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर १४ जुलै रोजी अंतिम लग्नसोहळा म्हणजे रिसेप्शन असेल. या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना भारतीय पारंपारिक पेहरावात येण्यास सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT