Mumbai Trans Harbor Link bus  sakal
मुंबई

Mumbai Trans Harbor Link: बेस्ट पाठोपाठ अटल सेतुवर धावणार एनएमएमटी बस!

एनएमएमटी बससेवा: नेरूळ ते मंत्रालयाचा प्रवास अटल सेतुमार्गे सुखद आणि सुलभ

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Bus Survice: बेस्ट पाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी बस देखील एमटीएचएल (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) अटल सेतुवरून धावणार आहे.

एनएमएमटी शासनाने नेरूळ ते मंत्रालय ही 115 क्रमांकाची वातानुकूलित बस एमटीएचएल मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या मार्गावरून ही बस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून प्रवास करता येणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करता यावा ,यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नेरूळ ते मंत्रालय ही एनएमएमटी बस सेवा एम टी एच एल मार्गे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी 115 क्रमांकाची वातानुकूलित बस सोडण्यात येणार असून ही बस खारकोपर ते मंत्रालयापर्यंत चालवली जात असून रहिवाशांच्या मागणीनुसार, ही सेवा आता नेरूळ येथून सुरू होईल आणि एमटीएचएल मार्गे जाईल.

नेरूळ ते मंत्रालय या 52 किमीच्या प्रवासासाठी सध्याचे भाडे 90 ठेवण्यात आले आहे. सध्या या मार्गावरून सकाळी 2 आणि सायंकाळी 2 अशा चार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, गत 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदीं यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू पुलावरून एन एम एम टी ची बस सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

चारचाकी वाहन नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अटल सेतू वरून जाता येत नव्हते. एनएमएमटी बस सेवेमुळे आता सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन भारतातील सर्वात लांब सागरी पुलावरून प्रवासाचा अनुभव घेता येणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

एनएमएमटीची नेरूळ ते मंत्रालय ही बस सेवा नव्यानेच सुरू झालेल्या अटल सेतुवरून लवकरच धावणार आहे. या बसच्या तिकिट दरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. प्रत्येक एसी बसमध्ये सध्या लागू असलेले तिकिट दरच आकारण्यात येणार आहे.

योगेश कडूसकर (व्यवस्थापक-नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT