ST esakal
मुंबई

Mumbai: एसटी महामंडळाची ट्रॉयमॅक्स कंपनीची स्मार्ट कार्ड योजना फसली

तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी योजना आणली होती.सुमारे ७ वर्ष होऊनही योजनेची प्रभावी अंमलबजावणी नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजना एसटी महामंडळात आणली होती. ट्रॉयमॅक्स कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र गेल्या ७ वर्षांपासून अद्याप या योजनेला एसटी महामंडळात प्रभावी अंमलबजावणी करू शकले नाही.

राज्य शासनाच्या २९ सवलती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना लागू करण्यात आली होती. मात्र, अजूनही ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली नसून, ज्या जेष्ठ नागरिकांची नोंदणीही त्यापैकी ६० टक्के पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना स्मर्ड कार्ड देण्यास ट्रॉयमॅक्स कंपनी असमर्थ ठरली असून, सध्यस्थितीत पूर्णतः स्मार्ट कार्ड यंत्रणा ठप्प पडली आहे.

या योजनेनुसार एसटी महामंडळाच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. त्याकरिता राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या योजनेमुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार असून, त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. विशेष म्हणजे, या स्मार्ट कार्डला रिचार्ज केले तर प्रवाशांना प्रवासा दरम्यान पैसेही बाळगण्याची गरज राहणार नसेल असे स्वप्न एसटी प्रवाशांना दाखवण्यात आले होते.

सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण बसद्वारे प्रवास करण्याला पसंती देतात. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करताना ज्येष्ठांना तिकिटाच्या दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा बसद्वारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो.

राज्य परिवहन महामंडळाने डिजिटलायझेशन स्वीकारून स्मार्ट कार्ड ची योजना मलात आणली होती. त्यासाठी प्रवाशांकडून स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना 50, 70, 100 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. आॅनलाईन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करून 1 महिन्यात संबंधितांना स्मार्ट कार्ड देण्याची घोषणा केली होती.

शिवाय ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला, याची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार होती. मात्र, सध्यास्थितीत एसटीची स्मार्ट कार्ड यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडली असून पुन्हा जुन्याच पद्धतीने मन्यूअली पद्धतीने योजनांचे पासेस देण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT