Mumbai News 
मुंबई

Mumbai : घाटकोपर इमारत दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; रविवारी सकाळपासून सुरू होता शोध

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - घाटकोपर पूर्व येथील रविवारी राजावाडी कॉलनीतील बी - ७ ही इमारत रविवारी खचून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नरेश पालांडे ( ५६) व अलका महादेव पालांडे (९४) या दोघांचे मृतदेह २४ तासानंतर सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आले आहेत.

रविवारी सकाळपासून या दोघांचाही शोध सुरु होता. दरम्यान, इमारत खचल्याने सुरक्षेसाठी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.

घाटकोपर पूर्व राजावाडी कॉलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही इमारत खचली होती. या दुर्घटनेत ढिगा-याखाली अडकलेल्या पाचजणांपैकी रविवारी तीन जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोन जण ढीगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा शोध सुरु होता.

अखेर २४ तासानंतर या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. शनिवारपासून मुंबईत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पहिल्याच पावसात दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. रविवारी सकाळी ९.३३ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व राजावाडी कॉलनीतील इमारत खचल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेची स्थानिक पोलीसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT