Smriti Irani 
मुंबई

स्मृती इराणींनी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये डोशावर मारला ताव

दोन केंद्रीय मंत्र्यांना आपल्यामध्ये पाहून हॉटेलमधल्या उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

दीनानाथ परब

मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आणि मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) काल मुंबईत आले होते. दोन्ही मंत्र्यांनी सोमवारी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून माटुंग्याच्या एका हॉटेलमध्ये (Matunga hotel) स्वादिष्ट डोसा (tasty dosa) आणि वड्याची चव चाखली. पोषक आहाराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या कार्यक्रमासाठी दोघेही मुंबईत आले होते.

"सर्वसामान्य माणसांसारखं हॉटेलमध्ये येऊन त्यांनी खाद्यपदार्थांचा सेवन केलं. दोन केंद्रीय मंत्र्यांना आपल्यामध्ये पाहून हॉटेलमधल्या उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना कुठलीही VIP ट्रीटमेंट दिली नाही" असे अधिकाऱ्याने सांगितले. अल्पसंख्यांक समुदायातील महिलांसाठी महिला आणि बाल विकास खातं तसेच अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने पोषण जागरुकता अभियान कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यासाठी संबंधित खात्याचे हे दोन्ही मंत्री मुंबईत आले होते. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी धारावीतील बाल विकास सेवा योजनेच्या केंद्राला भेट दिली. या योजनेच्या लाभार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली तसेच त्यांची घरी जाऊनही भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज! इराण-अमेरिका कराराच्या उंबरठ्यावर; ट्रम्प यांची होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्याची घोषणा

Horoscope Prediction : जूनपासून बदलणार मेष राशीबरोबर 6 राशींचं नशीब ! गुरुकृपेमुळे लक्ष्मी भरणार घरात पाणी

१८ व्या इंडिया हॅबिटॅट फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट आशा ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मी वचन दिलं होतं...’ कान्समध्ये ऐश्वर्या रायची चाहत्यांसाठी खास कृती, सोशल मीडियावर होतंय तुफान कौतुक, Viral Video

Latest Marathi News Live Update : आज देशभरात 'राष्ट्रकुल क्रीडा दिन' साजरा होणार

SCROLL FOR NEXT