File Photo 
मुंबई

मुंबई विद्यापीठाचे विभाजन होणार! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुन्हा सरकार स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात विधान भवनात शुक्रवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्‍यक असल्याचे सामंत यांनी सांगितले.

कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेणे शक्‍य होईल, असेही सामंत म्हणाले.

संत विद्यापीठ निर्मितीसाठी समिती स्थापन
महाराष्ट्राला महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. राज्यात पैठण येथे संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून, त्यासाठी समिती स्थापन करण्याचेही आदेश सामंत यांनी यावेळी दिले. या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असावा, असेही सामंत यांनी सांगितले. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने उपस्थित होते.

Mumbai University to be split!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

SCROLL FOR NEXT