मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) २०२०च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या  परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार पदवीस्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा ३ ऑक्टोबर २०२० पासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबर २०२० पासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या निर्देशानुसार या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपात घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयडॉलच्या उन्हाळी सत्राच्या सर्व थियरी परीक्षा ह्या ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. यानुसार पदवीस्तरावरील तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स व बीएस्सी आयटी सत्र ६ या अंतिम वर्षाच्या परीक्षा ३ ऑक्टोबर २०२० पासून घेण्यात येणार आहेत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी (गणित, आयटी व कॉम्प्युटर सायन्स ) व एमसीए सत्र ६ च्या  परीक्षा ८ ऑक्टोबर २०२० पासून घेण्यात येणार आहेत.

प्रथम व द्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी व एमसीए या अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी / बॅकलॉग  असलेल्या  विद्यार्थ्यांच्या परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून घेण्यात येणार आहेत. तर पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम व एमएस्सी ( गणित,आयटी,कॉम्प्युटर सायन्स ) या अभ्यासक्रमाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या व पुनर्परीक्षार्थी / बॅकलॉग  असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठाने दिलेल्या निर्देशानुसार या परीक्षा ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ५० गुणांच्या असतील व त्याचा वेळ एक तासाचा असणार आहेत. याचा अभ्यासक्रम आयडॉलने विद्यार्थ्यास दिलेल्या अध्ययन साहित्यावर आधारित असेल. विद्यार्थ्यांसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT