annabhau sathe Sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठाने लोकशाहीर अण्णा भाऊंना डावलले; साहित्यिक, कलावंतांमध्ये नाराजी

अध्यासन केंद्रासाठी एक रुपयाच्याही नव्या तरतुदीचा उल्लेख नाही

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Annabhau sathe) यांना आपल्या अर्थसंकल्पात (Budget) डावलले असून त्यांच्या नावे विद्यापीठात सुरू असलेल्या अध्यासन केंद्राचा (Adhyasan kendra) साधा उल्लेखही केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. विद्यापीठाने लोकशाहिरांनाच डावलल्याने याविषयी साहित्यिक, कलावंतांसह तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आपल्याकडे असलेल्या तब्बल ८४ विभागांची आणि विद्यापीठाच्या २१ कार्यालये, कक्ष, उपकेंद्राची माहिती अर्थसंकल्पीय अंदाज २०२२-२३ मध्ये प्रसिद्ध केली. मात्र त्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय या अध्यासन केंद्रासाठी एक रुपयाच्याही नव्या तरतुदीचा उल्लेख केलेला नाही.

विविध संघटना, साहित्यिकांच्या मागणीनंतर विद्यापीठाने मागील वर्षी आपल्या कलिना संकुलात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राची स्थापना केली होती. त्यासाठी पहिल्या वर्षी ५ लाख रुपयांची तरतूद केल्यानंतर या अध्यासन केंद्रामार्फत अनेक कार्यक्रमही आयोजित केले गेले. त्याचवेळी लोकमान्य टिळक रिचर्स ॲण्ड स्टडी सेंटरचीही स्थापना करण्यात आली होती. या सेंटरचा उल्लेख करत विद्यापीठाने लाखो रुपयांची तरतूद केली, मात्र दुसरीकडे लोकशाहिरांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अध्यासन केंद्राचा उल्लेखच टाळला.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचा अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत साधा उल्लेख असू नये, ही गंभीर बाब आहे. याबाबत विद्यापीठाने तातडीने खुलासा करावा, अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल.
- वैभव थोरात, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे हे दुसरे वर्षे आहे. त्यासाठी निधी ठेवला आहे. मात्र तो कुठे आहे हे सध्या सांगू शकत नाही. सोमवारी त्यावर बोलू शकेन. विभागाच्या यादीत नाव नसले तरी त्यासाठी निधीची तरतूद केली आहे.
- प्रा. प्रदीप कामथेकर, वित्त व लेखा अधिकारी, मुंबई विद्यापीठ.

२००३ पासून आम्ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी करत आहोत. त्यात मागील वर्षी त्यांच्या नावे सुरू झालेल्या अध्यासन केंद्राचा विद्यापीठाने आपल्या अर्थसंकल्पात उल्लेख करू नये, ही खेदाची बाब आहे.
- प्रा. शिवाजी देवनाळे, ज्येष्ठ विचारवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT