MA Result Sakal Media
मुंबई

एमए परीक्षेत कलाकारांची प्रथम श्रेणीत बाजी, 'या' माजी आमदारांना ९४% गुण

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एमएच्या भाग-1 आणि भाग-2 या परीक्षेचा निकाल (MA exam result) आज जाहीर झाला आहे. यातील एमए प्रथम वर्षाचा निकाल (MA first year result) 86.22 टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल 83.02 टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये अनेक मान्यवर बसले होते, ते या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत (first class) उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षा जून- 2021 मध्ये ऑनलाईन पद्धतीने (online exam) घेण्यात आल्या होत्या.

विद्यापीठाच्या एमए भाग-2 या परीक्षेत वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी वयाच्या 64 व्या वर्षी एमए राज्यशास्त्र या विषयात 94 टक्के गुण प्राप्त केले आहेत. पत्रकार केतन वैद्य व संगणकशास्त्र विभागाच्या डॉ.अंबुजा साळगावकर यांनी एमए इंग्रजी या विषयात प्रथम श्रेणी प्राप्त केली. या मान्यवरांबरोबर एमए भाग-2 मध्ये 2240 विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. तर 326 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 328 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

एमए प्रथम वर्षाच्या परीक्षेत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, चित्रपट व टीव्ही कलाकार आदेश बांदेकर यांनी राज्यशास्त्र या विषयात 88.5 टक्के, चित्रपट व टीव्ही कलाकार मधुरा वेलणकर यांनी मराठी विषयात 82 टक्के, वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी राज्यशास्त्र या विषयात 76 टक्के व कॅनडा येथील वैद्यकीय क्षेत्रातील एमडी असणाऱ्या डॉ.अलकनंदा धोत्रे यांनी इंग्रजी या विषयात 70 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.

एमए भाग -2 या परीक्षेत एकूण 2 हजार 894 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 3 हजार 237 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत ३ हजार २३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेला 6 विद्यार्थी अनुपस्थित होते. तर या परीक्षेत 217 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आयडॉलच्या परीक्षेत दरवर्षी कलाकार, खेळाडू, राजकीय व प्रशासकीय व्यक्ती अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील व्यस्ततेमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही ते मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमधून शिक्षण पूर्ण करीत असतात. हे मान्यवर विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT