mumbai ut  
मुंबई

कोरोनावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली; मुंबई विद्यापीठाचं विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: फेलोशिपच्या मागणीसाठी पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलने केल्यानंतरही मुंबई विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन करत असलेल्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संशोधक विद्यार्थी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फेलोशिप मुंबई विद्यापीठाने अद्याप दिलेली नाही. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी 11 व 12 मार्च 2020 रोजी विद्यापीठात बेमुदत आंदोलनही केले. यानंतर 12 मार्चला सर्व विद्यार्थ्यांसोबत कुलगुरू सुहास पेडणेकर यांची मीटिंग झाली. त्यावेळी फेलोशिप आठवड्याभरात देण्याचे आश्वासन विद्यार्थांना देण्यात आले.

परंतु विद्यार्थांना अद्यापही फेलोशिप मिळालेली नाही. पीएचडी ला असणारे बरेच विद्यार्थी हे आर्थिक अत्यल्प गटातील आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण फेलोशिपवर अवलंबून आहे. फेलोशिप न मिळाले काही विद्यार्थी हे कोरोनावर संशोधनही करत आहेत.
जगभरात संशोधनाला प्राधान्य देण्यात येत असताना मुंबई विद्यापीठाने पीएचडीच्या विद्यार्थांना वाऱ्यावर सोडले आहे. मुंबई विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजीसह विविध विभागाचे विद्यार्थी कोरोनावर संशोधन करत आहेत. अनेकांनी आपले रिसर्च पेपर विद्यापीठाकडे जमाही केलेले आहेत. 

असे असतानाही त्यांना हक्काची फेलोशिप पासूनही वंचित राहावे लागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले असतील, सर्व कामे जर चालू असतील तर मग विद्यार्थ्यांसोबत अन्याय का, असा सवाल छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थांना न्याय देण्यासाठी पेडणेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे विद्यार्थांना न्याय देण्याची मागणी केली. त्यावर सामंत यांनी फेलोशिप विद्यार्थांना द्यावी, असे निर्देश दिले आहेत, असे पेडणेकर यांनी सांगितले.

विद्यार्थांना फेलोशिप देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाने घेतली आहे. वित्त विभागाचे काम सुरू होताच विद्यार्थांना फेलोशिप मिळेल, असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

mumbai university not giving fellowship of students read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT