corona vaccination sakal media
मुंबई

सोमवारी महिलांसाठी कोविड 19 विशेष लसीकरण

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत महिलांच्या लसीकरणाचा (Women's vaccination) वेग वाढावा यासाठी मुंबई महापालिका (BMC) अनेक उपाययोजना राबवत आहे. याआधी मुंबईत फक्त महिलांसाठी 17 सप्टेंबर या दिवशी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम (special vaccination) आयोजित करण्यात आली होती. आता परत एकदा पालिकेकडून 27 सप्टेंबर या दिवशी लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. सोमवारी सकाळी 10 ते 6 च्या दरम्यान फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण होणार आहे.

पालिकेकडे पुरेसा साठा

पालिकेला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे. आज ही पालिकेला 3 लाख 50 हजार कोव्हिशील्ड आणि 1 लाख 36 हजार कोव्हॅक्सिनचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांत पालिकेला लसींचा तुटवडा भासणार नाही.  त्यामुळे, पालिकेने फक्त महिलांसाठी पुन्हा एकदा विशेष लसीकरण मोहिम घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड 19 लसीकरण सत्र भरवण्यात येणार आहे. महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी महापालिका विशेष मोहिम आयोजित केली.

थेट लसीकरण केंद्रावर जाऊन महिलांना पहिला आणि दुसरा डोस घेण्याची मुभा दिली गेली आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे,  महिलांनी या विशेष लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT