Vidyavihar Building Collapse Esakal
मुंबई

Vidyavihar Building Collapse : तब्बल २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून त्या दोघांना काढण्यात यश; पण मृत्यूची झूंज अपयशी

20 तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या दोन दिवसांपासुन पुणे मुंबईसह राज्याच्या काही भागात इमारत पावसाने हजेरी लावली आहे. तर दोनच दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईत इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. विद्याविहारमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. 20 तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचलं. तर पावसाच्या पहिल्या दिवशी विद्याविहारमधील इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ठिकाणी तब्बल 20 तास NDRF रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.(Latest Marathi News)

20 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आलं या दोघांवर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.(Latest Marathi News)

विद्याविहार येथील तीन मजली प्रशांत निवास इमारत काल (रविवारी) सकाळी खचली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या ढिगाऱ्याखालुन तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आलं. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबापैकी अलका आणि नरेश पालंडे यांना 20 तासानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)

विद्याविहार येथील ही इमारत 40 वर्ष आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक सखल भागामध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT