lion sakal media
मुंबई

जंगलच्या राजासाठीही राणीच्या बागेत रुग्णालय; अतिदक्षता विभागाचीही सुविधा

समीर सुर्वे

मुंबई : भायखळा (byculla zoo) येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात प्राण्यासाठी सुसज्ज रुग्णालय (Animal hospital) तयार करण्यात येत आहे. या रुग्णालयात प्राण्यांसाठी खास अतिदक्षता विभागही (ICU) असेल.येत्या वर्षात हे रुग्णालय कार्यरत होईल.

राणीच्या बागेत सध्या लहान प्राण्यासाठी तसेच पक्षांसाठी रुग्णालय आहे. आता बागेत वाघ,बिबळ्या दाखल झाला आहे.तर,येत्या काळात परदेशातून कांगारू,झेब्रा,जिराफ असे प्राणी तर देशातील इतर भागातून सिंहासह इतर प्राणी आणण्यात येणार आहेत.या प्राण्यासाठी पाच हजार चौरस फुटाचे रुग्णालय बांधण्यात येत आहे.या रुग्णालयाचे काम सुरु असून यात प्राण्यासाठी सर्व आवश्‍यक सुविधा उपलब्ध असतील असे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले.प्राण्यासाठी आयसीयू सारखीही सुविधा यात असेल असेही त्यांनी सांगितले.

60 कोटींचा खर्च

या रुग्णालया बरोबरच पक्षी,इतर प्राण्याचे विलगीकरण कक्ष,माकड प्रदर्शन सुविधा,मगर सुसर यांची प्रदर्शनी बांधण्यात येत आहे.या प्राण्यासाठी रात्रीची निवासस्थाने बांधण्या बरोबर तेथील पाणी कायम स्वच्छ राहील अशी यंत्रणा तयार करण्यात येत आहे.यासाठी पालिका 60 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च करत आहे.यात प्राणीसंग्रहालया भोवती आवश्‍यक भिंती आणि काटेरी तारेचे कुंपणही बांधण्यात येत आहे.तसेच,माकडांची रात्रीची निवीस स्थाने आणि त्यांना फिरण्यासाठी जागा तत्याच बररोबर मगर सुसर असे प्राणी पाण्याखाली पोहताना पाहाण्यासाठी पारदर्शक गॅलरीही बांधण्यात येईल.

रुग्णालयात हे असेल

-इनक्यूबिनेशन सेंटर

-शस्त्रक्रिया विभाग

-विविध चाचण्याची सोय

-क्षचिकीत्सा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT