taxi driver left mumbai Google
मुंबई

'या' महिन्यात मुंबई सुरक्षित असेल आणि शाळाही येतील उघडता

TIFR च्या अहवालातून मांडला दुसऱ्या लाटेमागचा निष्कर्ष

दीनानाथ परब

मुंबई: मुंबई शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण शोधण्यासाठी गणितीय मॉडेल मांडण्यात आले आहे. या मॉडेलनुसार मे च्या पहिल्या आठवड्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असेल. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर सध्या जास्त आहे. पण एक जूनपर्यंत जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होते तितके, मृत्यूदराचे प्रमाण खाली येईल, असा अंदाज या मॉडेलने वर्तवला आहे. TIFR च्या वैज्ञानिकांनी हे गणितीय मॉडेल मांडले आहे. (Mumbai will be safer by June 1 if no hitch in vaccination)

कुठल्याही अडथळ्याशिवाय मुंबईत लसीकरण सुरु राहिले आणि नव्या स्ट्रेनचा धोका नसेल, तर मुंबई १ जुलै किंवा त्यानंतर शाळा उघडण्याच्या स्थितीमध्ये असेल. दुसऱ्या लाटेचा २.३ लाख मुंबईकरांना फटका बसला असून एप्रिल महिन्यात १,४७९ मृत्यू झाले आहेत.

एक मे रोजी ९० मृत्यूंची नोंद झाली. या वर्षात मुंबईत कोरोनामुळे एकाच दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. मागच्यावर्षी २४ जून २०२० रोजी मुंबईत कोरोनामुळे एकाच दिवसात सर्वाधिक १२० मृत्यू झाले होते. (Mumbai will be safer by June 1 if no hitch in vaccination)

SARS-CoV-2 विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ही दुसरी लाट आल्याचे तसेच लोकल ट्रेन सेवेमुळे हा विषाणू पसरल्याचे संकेत TIFR च्या गणितीय मॉडेलमधुन देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुंबई शहर बऱ्यापैकी खुले झाले होते आणि लोकल ट्रेनही सामान्यपणे धावत होत्या. त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य मोठ्या जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव सुरु होता. रस्ते आणि रेल्वेमध्ये बऱ्यापैकी गर्दी वाढली होती. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला फैलावासाठी हे पोषक वातावरण होते. त्यातून दुसरी लाट आली, असे TIFR च्या गणितीय मॉडेलमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पहाटे गारवा, दिवसा 'ऑक्टोबर हिट'चा चटका, बदलत्या वातावरणामुळे पुणेकर हैराण; पुढील दोन दिवस कसे असेल हवामान?

Panchang 20 October 2025: आजच्या दिवशी शिवकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune Diwali : पुण्यात आकाशकंदील बांधताना अपघात; झाडावरून खाली कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, रात्री मंडळातील सदस्यांसह किल्ला बांधला अन्...

माेठी बातमी! 'खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे होणार दिवाळीनंतर'; सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाहणीसाठी महसूल यंत्रणा येणार..

Latest Marathi News Live Update : पुण्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता; पुणे वेधशाळेचा अंदाज

SCROLL FOR NEXT