मुंबई

मुंबई 1.5 हेक्टर खारफुटी क्षेत्र गमावणार, वाशी खाडीवर तिसरा पूल बांधणार  

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईतील खारफुटींचा मोठा पट्टा पुन्हा एकदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वाशी ते तुर्भे दरम्यानचे साधारणता 1.5 हेक्टरवरील खारफुटींचा बळी द्यावा लागणार आहे. वाशी आणि मानखुर्दला होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाशी खाडीवर तिसरा पूल बांधण्याचे प्रस्ताव आहे. पूल बांधणे गरजेचे असले तरी खारफुटींचं अधिक नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

सायन-पनवेल माहामार्गाचं सहा पदरीकरण करण्यात आले आहे. शिवाय मुंबई-गोवा माहामार्गाचे काम ही वेगाने सुरू आहे. सायन-पनवेल महामार्ग रूंद झाल्याने वाहनांची संख्या आणि वेग वाढला आहे. असे असले तरी वाशी टोलनाका तसेच मानखुर्द जवळील प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून वाशी खाडीवर तिसरा पूल उभारण्याचा विचार पुढे आला.

वाशी खाडीवर सध्या दोन पूल असून त्यातील जुना पूल 1973 तर नवीन पूल 1994 ला बांधण्यात आला. त्यातील जुन्या पुलावरून जड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे त्यावरून केवळ हलकी वाहने काही प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे अधिकतर वाहनांचा भार हा नवीन पुलावर येतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी या तिसऱ्या पुलाची गरज असल्याचे सांगत तसा अहवाल देखील सरकारला दिला आहे.

वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तोडण्यात येणाऱ्या खारफुटींबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने नोटीस ही काढली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरूवात देखील झाली आहे.  याबाबत पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण ठाणे खाडी किना-यावर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. या परिसरात फ्लेमिंगोचं वास्तव्य असतं. हे सर्व नष्ट होणार असल्याची भिती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

या नवीन पुलासाठी सुमारे 800 कोटी रूपये खर्च केले जाणारेत. मात्र कोरोना संसर्ग आणि त्यानंतर सुरू झालेली टाळेबंदी यामुळे हा प्रस्ताव रखडला आहे. मात्र पुन्हा एकदा कामाला सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत बोलताना पर्यावरणवादी झोरू भथेना यांनी सांगितले की, 'खारफुटींच्या परिसरात कमीतकमी बांधकाम करणे शक्य आहे. या पुलाचे काम पिलरच्या माध्यमातून केले तर बरीचशी खारफुटी आपण वाचवू शकतो. याचा विचार करणे गरजेचे आहे.'

---------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai will lose 1.5 hectares of saline area third bridge built over Vashi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT