मुंबई

मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल 44 कोटींचा दंड वसूल

समीर सुर्वे

मुंबई: मास्क न वापरणाऱ्या तब्बल 22 लाख 6 हजार जणांवर कारवाई करुन आता पर्यंत 44 कोटी 49 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या 17 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांवर आता पर्यंत मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई झाली आहे. मात्र, आजही मुंबईतील अनेक भागांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. खासकरुन लहान गल्ल्यांमध्ये रस्त्यांवर असे प्रकार सर्रास सुरु आहेच.

शनिवारी(ता.20) मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 21 हजार 420 जणांवर कारवाई करुन 42 लाख 84 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई एप्रिल महिन्यापासून सुरु आहेत. तर फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर महानगर पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी पोलिसांनाही या कारवाईचे अधिकार दिले. रेल्वे स्थानकावरही क्‍लिन अप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी पोलिसांनी 6 हजार 789 जणांवर कारवाई करुन 13 लाख 57 हजार रुपयांचा दंड जमा केला आहे. पोलिसांनी आता पर्यंत 1 लाख 85 हजार जणांवर कारवाई करुन आता 3 कोटी 71 लाख रुपयांचा दंड जमा केला आहे. मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 28 लाखांच्या आसपास आहे. आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 22 लाख 6 हजार लोकांवर कारवाई झाली आहे.

हार्बर रेल्वे मार्गाच्या हद्दीत सर्वात कमी कारवाई होत आहे. या मार्गावर शनिवारी 54 जणांवर कारवाई होऊन 10 हजार 800 रुपयांचा दंड वसूल झाला. आतापर्यंत या मार्गावर 1529 जणांवर कारवाई होऊन 3 लाख 5 हजाराचा दंड वसूल झाला आहे. पूर्व आणि पश्‍चिम मार्गावर या तुलनेने अनेक पटीने दंड वसुली होत आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर शनिवार 267 जणांवर कारवाई झाली. तर आतापर्यंत 6 हजार 527 जणांवर कारवाई होऊन 13 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. शनिवारी 53 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मार्गावर शनिवारी 168 जणांवर कारवाई होऊन 33 हजार 600 रुपयांचा दंड वसूल झाला. आता 6 हजार 321 जणांवर कारवाई होऊन 12 लाख 64 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एम पश्‍चिम देवनार शिवाजीनगर या भागात आतापर्यंत सर्वात कमी कारवाई होत आहे. शनिवारी या भागात फक्त 184 जणांवर कारवाई करुन 36 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत 31 हजार 766 जणांवर कारवाई होऊन 63 लाख 56 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Without mask Case 22 lakh people not wear masks fined 44 crore

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT