crime
crime sakal
मुंबई

Sex Trap: पोलिस असल्याची बतावणी; महिलेने स्वत:वरच छापा टाकायला लावून उकळले पैसे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एका महिलेने तिच्या तीन साथीदारांच्या मदतीने एका ५७ वर्षांच्या पुरुषाला लैंगिक संबंधांच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळल्याची घटना घडली आहे. तिने त्या पुरुषाला भाईंदर (पूर्व)मधील एका फ्लॅटमध्ये लैंगिक संबंधाच्या बहाण्याने नेलं. त्यानंतर या महिलेने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीनेच त्या पुरुषाला फसवलं आहे. तिच्या साथीदारांनी पोलिस असल्याची बतावणी करत त्या फ्लॅटवर छापा टाकून त्या व्यक्तीकडून 70 हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर या चौघाही आरोपींना सापळा रचून नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या ४५ दिवसांपासून ज्योती नावाची एक महिला फोन करून त्याला भेटण्याची विनंती करत होती. 23 मार्च रोजी तिने त्याला भाईंदर (पूर्व) मधील शिर्डीनगर येथील एका इमारतीतील फ्लॅटवर बोलावले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं दिसून आलं. २५ मार्च रोजी त्या फसवणूक झालेल्या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

त्या दिवशी फ्लॅटवर या महिलेने त्याच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच तीन पुरुष पोलिस असल्याचा बतावणी करत खोलीत घुसले. त्यांनी त्या व्यक्तीवर देह व्यापाराचा आरोप अटक केली जाण्याची धमकी दिली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली.

त्याचक्षणी त्यांनी त्याच्याकडून 45,000 रुपये रोख घेतले आणि त्याला एटीएममधून 25,000 रुपये काढायला लावले. उर्वरित पैसे दोन दिवसांत देण्याची धमकी देऊन त्यांनी त्याला जाऊ दिलं. या साऱ्या प्रकारातून सुटका झालेल्या त्या व्यक्तीने त्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली.

त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याच्या बहाण्याने खऱ्या पोलिसांच्या मदतीने या फसवणूक झालेल्या व्यक्तीने काशिमीरामधील एका हॉटेलबाहेर सापळा रचला. हे आरोपी त्या ठिकाणी उर्वरित रक्कम घेण्यासाठी आले. त्यातील दोन जण हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी पैसे स्विकारल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत त्यांना रेड हँड पकडले. त्यांनी इतर आरोपींनाही लागलीच पकडले. भाईंदरमधील आदर्श इंदिरा नगर येथील सुदर्शन खंदारे (३२), विरार (पूर्व) येथील रहिवासी विजय पाटील (५६) आणि भाईंदर (पूर्व) येथील रहिवासी अयुब खान (४५) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील महिला आरोपीचे नाव सांगितले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: थोड्याच वेळात लागणार बारावीचा निकाल, कुठे चेक करायचा? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

HSC Result 2024 : १२ वी निकाल येण्याआधी पालकांनी या गोष्टी नक्की कराव्यात, मुलांना आधार मिळेल

Bigg Boss Marathi: प्रतीक्षा संपली! मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा, यंदा महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

SCROLL FOR NEXT